कै. गीताबाई मरेप्पा कांबळे स्मृती दिनानिमित्त पुस्तक प्रकाशन व सत्कार समारंभ संपन्न

कै. गीताबाई मरेप्पा कांबळे स्मृती दिनानिमित्त पुस्तक प्रकाशन व सत्कार समारंभ संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील कै. गीताबाई मरेप्पा कांबळे यांच्या १६ व्या स्मृती दिनानिमित्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोपाळराव कांबळे यांच्या निवासस्थानी कु.सुश्मिता बोरगावकर या इयत्ता १२ वीत शिक्षण घेणाऱ्या बालकवयित्रीच्या ” दिवा ” या बालकविता संग्रहाचे प्रकाशन व नेत्रगाव येथील सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ” चला कवितेच्या बनात ” चे संयोजक तथा ज्येष्ठ साहित्यिक अनंत चंपाई माधव कदम, प्रा.डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे, बालाजी पाटील नेत्रगावकर, शंकर बोईनवाड, अरविंद पत्की यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कै. गीताबाई मरेप्पा कांबळे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.त्यानंतर कु.सुश्मिता यादवराव बोरगावकर हिच्या ” दिवा ” या बालकविता संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या नेत्रगाव ग्रामपंचायतच्या नूतन सरपंच सौ. हेमलता बालाजीराव पाटील, उपसरपंच सौ.लक्ष्मीबाई धनराज बिरादार, सदस्य सौ.लक्ष्मीबाई मल्हारी शिंदे, सौ. ललिताबाई हणमंतराव पाटील, अमोल माधव नेत्रगावकर, दत्तात्रय अर्जुनराव बिरादार, महादेव खुशालराव वडले, अंबिका अशोक कांबळे, राजकुमार शिवराम बिरादार, विठ्ठल रघुनाथ बिरादार, नवल हणमंतराव पाटील यांचा गोपाळराव कांबळे गुरुजी परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. कु.सुश्मिता बोरगावकर यांनी स्वागतगीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक व आभार सौ.मोरे मॅडम यांनी केले, तर सौ.शोभाताई गोपाळराव कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

About The Author