गुणवंत विद्यार्थ्यांना जगभरात मागणी – पंडित आम्ब्रे
उदगीर(एल.पी.उगीले) : विशिष्ट कौशल्य प्राप्त केलेल्या आणि एखाद्या विषयात आपल्या ज्ञानाचा ठसा उमटवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना भरपूर पगारावर जगभरात मोठी मागणी आहे.असे विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन जगभरातून परकीय चलन आपल्या देशाला पाठवून आपल्या बुद्धी कौशल्यावर आपल्या देशाचे नाव जगात उंचावत आहेत. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष प्रकारे देशाच्या विकासामध्ये आपले योगदान देत आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रचंड अभ्यास करून मोठे व्हावे, व आपल्या देशासोबत मानवी जिवनाच्या कल्याणासाठी प्रयत्न करावेत. असे मत वीनमेट लिमिटेड कंपनी तैवानचे सेल्स मॅनेजर पंडित आम्ब्रे यांनी उदगीर शहरातील अग्रगण्य शैक्षणिक चळवळ उदयगिरी अकॅडमी येथे झालेल्या त्यांच्या सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
सत्कार समारंभ अध्यक्ष स्थानी उदयगिरी अकॅडमीचे संचालक प्रा. गोपाळकृष्ण घोडके तर प्रमुख पाहुणे प्रा. चंद्रकांत गायकवाड ,उदयगिरी अकॅडमीचे संचालक मार्गदर्शक प्रा. संतोष पाटील, प्रा.डॉ.धनंजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदयगिरी अकॅडमीचे मार्गदर्शक प्रा. ज्योती खिंडे, प्रा.श्रीगण वंगवाड, प्रा. मीनाताई हुरदळे, प्रा. नंदिनी नीटूरे , प्रा.निवेदिता भंडारे यांच्यासह उदयगिरी अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी अकॅडमीतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला पंडित आम्ब्रे यांनी रोख पारितोषिक जाहीर केले व त्याचा धनादेशही सुपूर्त केला.