आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यु. कॉलेज देवणी येथे राष्ट्रीय बालिका दिन निमित्त विविध कार्यक्रम
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी येथील आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यु. कॉलेज येथे, राष्ट्रीय बालिका दिन विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. यात बालिका सक्षम व्हाव्यात म्हणून त्यांना कराटे प्रशिक्षण देऊन त्यांचा असिहरा कराटे असोसिएशन लातुर व वंचित मानव अंबुलगा द्वारा संचलित सेल्फ डिफेन्स मल्टीपर्पज अकॅडमी देवणी च्या माध्यमातून कराटे स्पर्धा परीक्षा घेऊन मुला-मुलींना ग्रीन बेल्ट, येल्लो बेल्ट देण्यात आला. तसेच या परीक्षेसाठी परीक्षक म्हणून अशिहारा कराटे असोसिएशन लातुरचे अध्यक्ष के वाय पाटवेकर व प्रशिक्षक विक्रम भगवान गायकवाड हे लाभले. तसेच घरगुती गॅस कसा वापरायचा? जेणे करून त्याचा स्फोट होणार नाही. यासाठी इंडियन गॅस देवणी च्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले. स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. असे विविध कार्यक्रम राबवून राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रशांत घोलपे ,अधीक्षक वैष्णवी बिरादार, विजयकुमार भोजने यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश आंबेनगरे, क्रीडा विभाग प्रमुख विक्रम गायकवाड तसेच रणजित गायकवाड, रामदास नागराळे इत्यादी शिक्षकांनी केले. सदरील कार्यक्रम जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणीचे संस्था अध्यक्ष गोविंदरावजी भोपणीकर व संस्था सचिव गजाननजी भोपणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजीत गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रियंका मंटोळे यांनी केले.तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला.