प्रा. किरण पाटील यांना बहुमताने विजयी करा – माजी आमदार भालेराव

प्रा. किरण पाटील यांना बहुमताने विजयी करा - माजी आमदार भालेराव

उदगीर (एल.पी.उगीले) : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष,बाळासाहेबांची शिवसेना व मित्र पक्षाचे उमेदवार प्रा. किरण नारायण पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आणि ते प्रश्न सोडवण्याची क्षमता असलेले कर्तबगार उमेदवार किरण पाटील यांना विजयी करून आपले प्रश्न शिक्षकांनी सोडउन घ्यावेत. ज्यांच्याकडे सामाजिक प्रश्न सोडवण्याची जाण आहे अशाच उमेदवाराला मते द्यावे असे आवाहन माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी केले आहे. उदगीर येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमेश पाटील देवणीकर हे होते. यावेळी किरण पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करावे असे आवाहन माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी केले. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, शंकरप्पा हरकरे,माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे,शहराध्यक्ष मनोज पुदाले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके,दत्ता पाटील,बालाजी गवारे, धर्मपाल देवशेट्टे,धनराज बिरादार, दिलीप मजगे,सौ.श्रद्धा जगताप, गणेश गायकवाड,व्यकंटराव पाटील यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!