विक्रम काळे यांच्या प्रचारासाठी आमदार बनसोडे यांचा झंजावाती दौरा

विक्रम काळे यांच्या प्रचारासाठी आमदार बनसोडे यांचा झंजावाती दौरा

जळकोट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधान परिषदेतील मराठवाडा शिक्षक मतदार संघाची निवडणुक 2023 करीता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. विक्रम वसंतराव काळे हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने जळकोट तालुक्यातील विविध ठिकाणी विद्यालयास, माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी भेट देऊन प्रचारार्थ सभा व बैठकी घेतल्या.

जळकोट तालुक्यातील संत गोविंद स्मारक विद्यालय मौ. वांजरवाडा, संभाजीराव केंद्रे महाविद्यालय जळकोट, ज्ञान विकास विद्यालय मौ.पाटोदा बु., श्री समर्थ धोंडू तात्या विद्यालय मौ.कोळनूर, उज्वल ग्रामीण विद्यालय, मौ.घोणसी येथील शिक्षकांशी सुसंवाद साधला.

विक्रम वसंतराव काळे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांनी प्रत्येक शाळेला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या परिपूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत राहिले.सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखणण्याजोगी आहे. असे आ. विक्रम वसंतराव काळे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याच्या आवाहन आमदार संजय बनसोडे यांनी केले. यावेळी शिक्षक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!