जिल्ह्यात 538 कोरोनाबाधित रुग्ण; एका रुग्णाचा मृत्यू

जिल्ह्यात 538 कोरोनाबाधित रुग्ण; एका रुग्णाचा मृत्यू

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात 538 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात 896 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 219 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 14 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 2464 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 319 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 30357 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 3402 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 728 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 26226 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 196 आहे.

About The Author