वन विभाग कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हरणाच्या पाडसाचा मृत्यू
नणंद (प्रतिनिधी) : नणंद येथे पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेल हरणाचे पाडस खुर्शीद शेख यांच्या शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला. दि. 25 रोजी येथील अवघ्या काही महिन्याचे पाडस पाण्याच्या शोधात भटकंती करत असताना विहिरीत पडल्यानंतर ते जिवंत असताना गावातील काही युवकांनी वन विभागाच्या विजयकुमार नेकनाळे अधिकाऱ्यांना फोनवरून ही माहिती देण्यात आली अधिकाऱ्यांनी वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पाठवले परंतु या कर्मचाऱ्यांनी याला काही होत नाही असे सांगून उद्या त्याला आपण बाहेर काढू असे सांगून ते परत गेले व रात्रभर ते पाडस तसेच विहिरीत राहिले व त्यांचा मृत्यू झाला वेळीच बाहेर काढले असते तर हे हरणाचे पाडस जिवंत राहिले असते असे गावातील युवकांचे म्हणणे आहे फक्त आणि फक्त अशा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच निष्पाप प्राण्यांना प्राणाला मुकावे लागले.