जय हिंद पब्लिक स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) :येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ,उदगीर संचलित जय हिंद पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये 75 वा ‘आजादी का अमृत महोत्सव’ व संस्थेच्या रौप्य महोत्सवा निमित्त वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर जगताप होते, तर उदघाटनबँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यस्थापक अमित चंदन यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून लोकप्रिय कॉमिडन रामेश्वर (ज्युनिअर जॉनी लिवर),अमित कुमार,कृष्णा गठडे, गणेश तोलसरवाड,ज्योती तारे, नागेसन तारे, डॉ. धनंजय गोंड, संजय हट्टे,अतेंद्र सिंग,नुतून नायर, मनोरमा शास्त्री,सतीश वाघमारे,ज्योती स्वामी, प्रा. अमर तांदळे,राहुल पुंडगे,आकाश कांबळे,डॉ. चव्हाण एस.एन. यांची उपस्थिती होती.या स्नेहसंमेलनात ‘आजादी का अमृत महोत्सव’ हा विषय विद्यार्थ्यांना कलाविष्कारासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर एका पेक्षा एक सरस असे कलाविष्कार सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. यासोबतच विद्यार्थ्यांनी कोळीगीत, लोकगीत, चित्रपट गीत,यावर ही कला सादर केली.या स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण लोकप्रिय कॉमिडिन रामेश्वर ज्युनिअर जॉनी लिवर हे होते. त्यांनी सुरवातीला आपल्या कलेने उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकामध्ये उत्साह भरला, त्यांनी विविध सिने अभिनेते व राजकारणी यांची नक्कल करीत सर्वत्र हास्यमय वातावरण निर्माण केले.प्रारंभी स्नेहसंमेलनाचे उदघाटक अमित चंदन आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणा सोबत आपल्यातील विविध कलागुणांना देखील वाव दिला पाहिजे. त्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेऊन आपण निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणे आवश्यक आहे, असे सांगितले. याप्रसंगी स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुधीर जगताप असे म्हणाले की, विद्यार्थीच्या सर्वांगीण विकासासाठी अशा स्नेहसंमेलनाची आवश्यकता असून शाळेमध्ये शिक्षणा सोबत इतरही कार्यक्रम घेणे गरजेचे आहे. पालकांनी देखील या कार्यक्रमा व्यतिरिक्त शाळेद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे, असे आवाहन ही त्यांनी केले.या स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक नूतन नाईक यांनी केले. तर सूत्रसंचालन सतीश वाघमारे, कु.ऐश्वर्या राठोड,कु.रिया सुडे यांनी केले. व आभार संजय हट्टे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकानी, एन. एस. एस. च्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
