“उदय क्लिनिक अँड पथोलॉजी” चा रौप्य महोत्सव साजरा

"उदय क्लिनिक अँड पथोलॉजी" चा रौप्य महोत्सव साजरा

उदगीर(एल.पी.उगीले) : कॅप्टन कृष्णकांत चौक ,दंडवते कॉपलेक्स देगलूर रोड उदगीर येथील डॉ. गुजलवार यांच्या उदय क्लिनिक अँड पथॉलॉजी लॅबोरेटरी या वैद्यकिय सेवेस  25 वर्ष पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला.

त्यानिमित्त   मोफत  हिमोग्लोबीन ,शुगर तपासणी तसेच ब्लड प्रेशर या बाबत रुग्णाची  आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात प्रचंड संखेनी रुग्णांनी सहभाग नोंदविला . शाळा,महाविद्यालय , दैनदिन रुग्ण,लहान मुले , वृध्द   तसेच सर्व स्तरातील रुग्ण उपस्थित होते.

या प्रसंगी अजय दंडवते ,डॉ प्रवीण देशमुख , डॉ जाधव नरेंद्र,अपर्णाताई पटवारी ,मंजुषा कुलकर्णी ,अनुराधा धोंड , शेळकिकर अंजली,अनिता शानेवार, मळभागे राच्ममा ,महेश गादेवार, सुलभा कुलकर्णी आदींनी सहभाग नोंदविला. तसेच  उदगीर येथील समर्थ पॉरामेडिकल  सायन्स  महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी शिबिरात उत्साहाने सहभाग नोंदविला .महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश पाटील , सचिव आविज धुपे , प्रोफेसर शेख मुस्कान, पल्लवी तेलंगे ,स्वामी हिरा   आणि गायकवाड अमित ,स्वामी सुयश अशा तब्बल 75विद्यार्थ्यानी   सहभाग नोंदविला.

सर्व विद्यार्थ्याना सुरेखा गुजलवार यांनी रक्तातील हिमोग्लोबीन अत्यंत महत्वाचा घटक असून तो कमी झाल्यास होणाऱ्या  अनेमिया आजाराची  लक्षणे ,उपचार  काळजी , यावर विद्यार्थ्याना मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिके दाखवले.  रुग्णाचे रक्तातील  हिमोग्लोबीन,शुगर तसेच रक्त दाब तपासताना हायपोग्लेसमिया,काही जणांना हायपर ग्लेसेमिया,अधिकांश रुग्णांना ऑनेमिया आढळला . संबंधी रुग्णाची फेर आरोग्य तपासणी करून त्यावरील औषधी देखील वाटप करण्यात आले.
डॉ उदय गुजलवार आणि सौ सुरेखा गुजलवार हे आरोग्य  शिबिराच्या  माध्यमातून सतत  सामाजिक सेवा करत असतात.

उदगीर येथील विविध शाळा,वसतिगृह , कामगार केंद्र येथे त्यांनी रक्त व आरोग्य तपासणी  बाबत मोलाचे कार्य केले आहे .कोरोना काळात  देखील विविध माध्यमातून जनजागृती , मास्क वाटप ,मोफत शिबिरे सामाजिक प्रबोधन यातून   जनसेवा केली आहे.

उत्तम आरोग्यासाठी सकस आहार फळे पालेभाज्या यांचाही आहारात समावेश असावा आणि आरोग्य हिच  आपली खरी संपती आहे  त्याचे रक्षण करावे असे  डॉ. गुजलवार  यांनी   रुग्णांसमोर  आपले मत व्यक्त केले. या शिबिरात 300 रुग्णाची तपासणी झाली .सचिन जाधव,जितेंद्र खडके,दीपक फताटे,सुलेमान शेख या सहायक वर्गानी  मदत केली.

About The Author

error: Content is protected !!