बायको असतांना ठेवल्या दोन बाया!! स्रीलंपट श्रीमंतचे जीवन गेले वाया!!!

बायको असतांना ठेवल्या दोन बाया!! स्रीलंपट श्रीमंतचे जीवन गेले वाया!!!

लातूर (ॲड.एल.पी. उगिले) : “ग्रामीण भागात दोन बायका फजिती ऐका” असे सर्रास म्हटले जाते.दोन बायाच्या नवऱ्याची कशी वाताहत होते? याच्याही गमतीशीर गोष्टी सांगितल्या जातात. मात्र बाईलवड्या व्यक्तीने बायको असतानाही दोन रखेल ठेवून पुन्हा अधून मधून तिसऱ्या, चौथी कडेही त्याची नजर असायची! त्याच्या या स्त्रीलंपट पणाची कथा पंचक्रोशीत गमंतीशीर पद्धतीने सांगून लोक मजा घ्यायचे. मात्र त्याला त्याचे काहीही देणेघेणे नव्हते. तो आपल्या मौजमस्तीत जगत होता. मानवी जीवन एकदाच मिळते! त्याचा आनंद, पुरेपूर उपभोग घ्यावा. हा सिद्धांत डोळ्यासमोर ठेवून तो स्वैराचारी वृत्तीने जगत होता. मनसोक्त दारू पिणे, एखादी सुंदर बाई दिसली की लगेच तिच्या मागे गोंडा घोळणे आणि ती जर त्याच्याकडे पाहून हसली की मग तो तिला बनवण्याच्या नादात राहायचचा! सुखी संसार असतानादेखील त्याने स्वतःचा मोठेपणा सांगण्यासाठी दोन रखेल ठेवल्या होत्या. त्यावरही त्याचे समाधान होत नव्हते, तो पुन्हा इकडे तिकडे वास काढत फिरायचा. अशा पद्धतीची चर्चा गावात आणि परिसरात होत होती. लोक त्याला दूषणे देत होती. मात्र त्याला त्याचे काहीच वाटत नव्हते.

 राजा-महाराजा आपली श्रीमंती सांगण्यासाठी अनेक राण्या करायचे, त्याच पद्धतीने आपणही जगावे. असे त्याला वाटायचे, आणि मग तो आपोआपच त्या विचार श्रेणीमध्ये गुरफटून स्त्रीयाकडे आकर्षित व्हायचा. तसा त्याचा स्वभाव रगेल आणि रंगेल असला तरी म्हणावी तशी घरी श्रीमंती नव्हती! पाच एकर बर्‍यापैकी जमीन एवढेच काय ते भांडवल. त्या पाच एकरांपैकी चार एक्कर  दोन रखेलींना प्रत्येकी दोन दोन एकर शेती द्यायची तो तयारी करत होता. तसा त्याचा संसार नीट चालत होता. मात्र आता ही चार एकर शेती गेल्यास जगायचे कसे? असा गंभीर प्रश्न त्याच्या पत्नीला पडला होता. ती विचार करत होती, त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती. मात्र पालथ्या घड्यावर पाणी म्हणतात तसे होत होते. तो तिचे काहीच ऐकत नव्हता. परिणामतः त्या दोघात सतत वाद होत राहायचे! त्यांनी आपल्या तिन्ही मुलींची लग्न केली होती. त्यामुळे आपली जबाबदारी संपली. असे त्याला वाटायचे, त्यामुळे आपण आपल्या मनाप्रमाणे जगावे असे तो ठरवत होता.

बायको असतांना ठेवल्या दोन बाया!! स्रीलंपट श्रीमंतचे जीवन गेले वाया!!!

 मात्र सामाजिक बांधिलकीच्या चौकटी उधळून टाकून त्याचे जगणे लोकांना पटत नव्हते. गावातील आणि परिसरातील लोक त्याच्या पत्नीला समजावून सांग म्हणून सांगत होते. मात्र ती बिचारी काहीच करू शकत नव्हती. अशात तर त्याचे दारू पिण्याचे प्रमाण आणि बाया कडे जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले होते. दारूच्या आणि बाई च्या आहारी जाऊन तो आपली सर्व संपत्ती गमावून बसेल. अशी भीती त्याच्या पत्नीला सारखे वाटत होती. पण तिला काहीच करता येत नव्हते. आपल्या मनातील खंत ती जावयाला बोलून दाखवत होती. तसे तोही हतबल होता. मात्र याला काहीतरी प्रतिबंध केला पाहिजे, असे त्यांना सारखे वाटू लागले होते. तो त्या रखेली कडे गेला की दुसरी रखेल त्याला बोलवायची आणि त्यातही अधून-मधून तो इतरत्र भटकत फीरायचा! त्यामुळे त्याचे चरित्र समजून घेणे कठीण होते. तो कधी काय करेल? याचा नेम नव्हता. किमान त्याचे घर तरी साबित राहावे असे त्याच्या जावयाला वाटायचे. त्यादृष्टीने तोही विचार करायचा, याच दरम्यान त्याचा मुलगा पारिवारिक चिंतेतून उद्विग्न झाला आणि मग नको त्या मार्गाला लागला. कर्नाटक राज्यात अमली पदार्थांची तस्करी करण्यामध्ये त्याला मजा येऊ लागली आणि यातच तो कर्नाटक पोलिसांच्या हाती सापडला. त्याला बिदर जेलमध्ये पाठवण्यात आले. त्यामुळे त्या माय माऊलीला खूप वाईट वाटू लागले.

 एका बाजूला पती स्वैराचारी तर मुलगा करतोय जेलची वारी! अशा दुष्टचक्रात ती सापडली होती. यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे असे तिला सारखे वाटू लागले होते. तिने मग आपल्या जावयाला बोलावून घेतले आणि काहीतरी विचारमंथन केले.

 दिनांक 15 मार्च  रोजी औसा तालुक्यातील याकतपूर शिवारात उमेश बंडगर यांच्या शेताजवळ लोकांनी एकच गर्दी केली होती. नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला जाणारे औसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे यांनी ती गर्दी पाहिली, त्यांना ते नवीन वाटले. त्या ठिकाणी काहीतरी निश्चित घडले असावे ,म्हणून ते पुढे झाले. नेमका काय प्रकार आहे? हे पाहावे म्हणून त्यांनी गर्दीचा कानोसा घेतला आणि त्या दिशेने आपला मोर्चा वळवला! गर्दीतून थोडे पुढे जाताच, त्यांचे पाय थबकले! कारण समोर भयानक प्रकार होता. याकतपूर जाणाऱ्या रस्त्यापासून काही अंतरावर एक 45 वर्षीय पुरुष जातीच्या इसमाचा मृतदेह दिसून आला. त्याच्या उजव्या पायाच्या पंजा रक्ताने माखलेला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे यांनी घटनेची प्राथमिक माहिती घेऊन औसा पोलीस स्टेशन आणि आपल्या वरिष्ठांना या घटनेची माहिती कळवली. घटनेची माहिती मिळताच याकतपूर गावचे बीट अंमलदार आणि औसा पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी धावले.

 अंगात पिवळसर फुल भायाचा शर्ट आणि  फिकट रंगाची पॅन्ट परिधान केलेला अनोळखी इसम उताना पडला होता. त्याच्या बाजूलाच  काही अंतरावर भगवा रंगाच्या टावेल पडले होते. त्याच्या कमरेला पिवळसर रंगाचा पट्टा बांधला होता. तसेच त्याच्या उजव्या पायाचा अंगठा रक्ताने माखलेला दिसत होता.

 दरम्यान औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरसिंह ठाकुर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची प्राथमिक माहिती घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. पंचनामा करायला सांगितले,दरम्यान याकतपूर शिवारात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची वार्ता औसा शहरात वार्‍यासारखी पसरली. घटनास्थळाकडे औसा परिसरातील लोक एकच गर्दी करत होते. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले हे देखील घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनीही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

 मयत कोण? हे समजल्याशिवाय या प्रकरणाचा तपास लागणे शक्य नव्हते. मयताची ओळख पटवण्याचा दृष्टीने पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. मयताची ओळख पटावी म्हणून मयताची अंगझडती घेतली. मात्र कुठलाच पुरावा पोलिसांना सापडत नव्हता. त्याच्या गळ्यात काळसर रंगाचे दोन व्रण दिसून येत होते. त्यावरून पोलिसांना हा घातपात असल्याचा प्राथमिक अंदाज येत होता. पोलिसांनी घटनास्थळ परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली. या पासून थोड्या अंतरावर वाळलेल्या गवतात पोलिसांना एक मोबाईल सापडला. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे यांनी तो मोबाईल हस्तगत करत, सापडलेल्या मोबाईल वर आलेल्या शेवटचा कॉल वर संपर्क करून हा मोबाईल क्रमांक कोणाचा आहे? अशी विचारणा केली. तेव्हा समोरच्या व्यक्तीने सदरील मोबाईल क्रमांक औसा तालुक्यातील चलबुर्गा गावचा श्रीमंत शेषराव आळणे यांचा असल्याची माहिती दिली .पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत या गावच्या पोलीस पाटलांना आणि पोलीस मित्रांना संपर्क करून श्रीमंत पाळण्याच्या बाबतीत अधिक माहिती गोळा करून त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नातेवाईकांना घटनास्थळी बोलावून घेण्यास सांगितले.

 दरम्यान घटनास्थळी आलेल्या एका तरुणाने मयत हा आपला मामा असून त्याचे नाव श्रीमंत शेषराव आळणे असल्याची माहिती दिली. अशाप्रकारे मयत व्यक्तीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. घटनास्थळावर परिस्थिती पाहता मयतास दुसरीकडे कुठेतरी जीवे मारून या ठिकाणी आणून टाकले असावे, असा अंदाज पोलिसांना येऊ लागला. तसेच या घटनेत दोन पेक्षा अधिक मारेकरी असण्याची शक्यता पोलिसांना वाटत होती. पोलिसांनी पंचनामा आटोपून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. दरम्यान पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरसिंग ठाकूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे यांनी त्यांच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन मयत श्रीमंत आळणेचे कोणा सोबत भांडण,  दुश्मनी होती का? त्याची माहिती जाणून घेतली. मात्र मयत श्रीमंत आळणेची कोणासोबतही भांडण अथवा दुश्मनी नसल्याची माहिती समोर आली. 

एवढी वाईट घटना घडूनही मयताची पत्नी अथवा त्याचे नातेवाईक कुठलीच रडारड,विलाप करत नसल्याचे पोलिसांच्या नजरेतून सुटत नव्हते. याबाबत पोलिसांना आश्चर्यही वाटत होते.

 पोलिसांनी मयताच्या नातेवाईक कडून, मयताच्या पत्नीकडे विचारणा करून तुमचा कुणावर संशय आहे का? अशी विचारणा केली असता त्याच्या पत्नीने आमचा कोणावर हि संशय नसून ,आमची कुठलीच तक्रार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

 हे ऐकून कुठेतरी पाणी मुरते हे ओळखायला अनुभव पोलिसांना वेळ लागला नाही. मयताचे नातेवाईक फिर्याद देत नसल्याचे पाहून पोलीस हैराण झाले होते. दरम्यान मयत श्रीमंत आळणे याच्या डोक्यात जाड वस्तू मारून त्याच्या गळ्याभोवती आवळून त्याचा खून केल्याचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना मिळाला. फिर्याद येत नसल्यामुळे याला वाचा फोडण्यासाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल महादेव नारायण गिरी यांच्या फिर्यादीवरून श्रीमंत आळणेचा अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी खुन केल्याची नोंद औसा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 74/ 21 कलम 302, 201 भारतीय दंड विधान संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे सूत्र औसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे यांच्या हाती देण्यात आले. या खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे यांनी तपासाची चक्रे गतिमान केली. 

सर्वप्रथम मयत राहत असलेल्या चलबुर्गा गावी जाऊन त्यांनी त्याच्या संदर्भात माहिती काढली. गावात गेल्यानंतर मयत श्रीमंत आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. श्रीमंत आळणेचे कोणाशी वैर आहे का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना फारसे यश आले नाही. श्रीमंत आळणे हा मूळ चलबुर्गा गावचा रहिवासी होता. श्रीमंत शेषराव आळणे त्याला वडिलोपार्जित पाच एकर शेती होती. तो वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे लग्न आनिता सोबत झाले. त्या पाच एकर जमिनीत काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. श्रीमंत आळणे आणि अनिता यांना तीन मुली आणि एक मुलगा असे आपत्य होती. सुरुवातीपासून श्रीमंत पाळणेला दारूचे व्यसन होते. श्रीमंत  आठवडी बाजारात जाऊन जनावरांची खरेदी विक्री आणि दलाली करत होता. त्यामुळे चार पैसे बाळगून होता. औसा तालुक्यात त्याचा बराच परिचय होता. जनावरांच्या व्यापारातून श्रीमंत पाळणेला पैसे मिळायचे, अशात त्याला दारूचे चांगलेच व्यसन झाले होते. तसेच तो स्त्रीलंपट असल्याने अनेक महिलांसोबत त्याचे संबंध असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्याचे बाहेर अनेक स्त्रियांसोबत संबंध होते, श्रीमंत  हा आठवड्यातून बरेच दिवस बाहेर राहयचा, तो दारू पिऊन सारखाच पत्नीला वाद घालत होता. त्यामुळे श्रीमंत आळण्याच्या घरातील शांतता भंग पावली होती. श्रीमंत आळणे यांनी आपल्या तिनीही मुलींचे लग्न लावून मोकळा झाला होता.

 वासनांध असलेल्या श्रीमंत  याची आपल्या पोटच्या मुलीवर ही वाईट नजर होती, अशी चर्चा गुप्त बातमीदारा मार्फत पोलिसांना समजली. तसेच त्याला एकुलता एक मुलगा गांजा तस्करी करताना कर्नाटक पोलिसांच्या हाती सापडला होता. 

श्रीमंत आळणेचा अनैतिक संबंधातून कोणीतरी खून केला असावा असा प्राथमिक अंदाज बांधून सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे यांनी त्या दिशेने तपास सुरू केला. श्रीमंत  यांचा दिनक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. राहून राहून श्रीमंत आळणे चा खून नेमका कोणी केला असावा? हा प्रश्न सारखाच पोलिसांच्या समोर येत होता. तसेच त्याच्या घरून कोणीच तक्रार का दिली नसावी? हा प्रश्न पडला होता. तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक डोंगरे यांच्या डोक्यात मयताच्या नातेवाईका बद्दल  संशय निर्माण झाला होता. मात्र सबळ पुरावा मिळत नव्हता. त्यामुळे नाविलाजाने त्यांनी श्रीमंत आळणे त्याच्या मोबाईल चे लोकेशन आणि सीडीआर तपासाला सुरुवात केली. या बाबींचा सखोल अभ्यास  केला तसेच मृत्युपूर्वी कोणा कोणाला भेटला होता? याची माहिती काढायला सुरुवात केली.

 दिनांक 14 मार्च रोजी श्रीमंत आळणे कोणाला भेटला? याची गुप्त माहिती घ्यायला सुरुवात केल्यानंतर आणि त्यादिवशी आठवडा बाजारात हरभऱ्याचा एक कट्टा विक्री केला होता. याची माहिती पोलिसांना समजली,  पोलिसांनी बाजारात जाऊन अधिक माहिती घेतली असता पोलिसांना तपासाचे दिशेने एक आशेचा किरण दिसू लागला. श्रीमंत आळण्याचा खून होण्याच्या आदल्या दिवशी श्रीमंत आळण्याचा मोठा जावई भीवा वामन थोरात व एक जण श्रीमंतच्या मागावर होता व अनिता आळणे या दोघांच्या संपर्कात होती. अशी गुप्त माहिती पोलिसांच्या हाती आली.

 सुरुवातीपासूनच पोलिसांनी आनिता आळणे यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते. या प्रकरणात आनिता आळण्याचा हात असल्याची खात्री पटताच, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे यांनी पोलिसांचे एक पथक तयार केले.

 या पथकामध्ये रवी जाधव, महादेव फुले व डी बी यांच्या पथकातील पोलिसांचा समावेश करण्यात आला. या पथकाने चलबुर्गा येथून या प्रकरणातील संशयित आरोपी आनिता आळणे हिला ताब्यात घेतले. सर्वप्रथम तिच्याकडे या प्रकरणात चौकशी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. मात्र पोलिसांच्या वेगळ्या प्रश्नांचा भडिमार तिला सहन झाला नाही. शेवटी तिने आपणच आपल्या नवर्‍याचा काटा काढल्याचे पोलिसांना सांगितले .अनिता आळणे हिने सांगितलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना या प्रकरणात अधिक माहिती मिळाली. अनिता यांनी सांगितले की, श्रीमंतचे बाहेर अनेक स्त्रिया सोबत संबंध होते. तो स्त्रीलंपट होता, तो दारू पीत होता. शुल्लक शुल्लक कारणावरून घरात भांडत होता,त्याने बाहेर दोन बाया ठेवल्या होत्या. आलेली कमाईतून बाहेर उधळत होता. तसेच वडिलोपार्जित असलेल्या पाच एकर जमिनीपैकी चार एकर जमीन तो त्या रखेलींना  देणार होता. त्यामुळे आनिताच्या मनामध्ये आपल्या नवऱ्या बद्दल प्रचंड चीड निर्माण झाली होती. एक तर तो तिला कसलेच सुख देत नव्हता,उलट दररोज तो तिच्या सोबत वाद घालून तिला शिवीगाळ करायचा, वेळ प्रसंगी मारहाणी करायचा. त्यामुळे त्याचा काटा काढावा, अशी गोष्ट तिच्या मनात सतत घ्यायची. ही गोष्ट तिने आपला मोठा जावई भिवा थोरात याला सांगितले.आपण सासूची मदत करावी असे त्याने ठरवले. श्रीमंत चा कायमचा काटा काढण्यासाठी भिवा थोरात यांनी एक साथीदाराची मदत घ्यायचे ठरवले.त्याने एक साथीदार सोबतीला घेतला. त्याला सुपारी दिली.त्यांनी एक लाखाची मागणी केली. मात्र एवढे पैसे आपल्याकडे नसल्याचे अनिताने सांगितले,शेवटी तडजोड अंती  चाळीस हजारावर सुपारी ठरली. एवढेच नव्हे तर खुन केल्यानंतर एक महिन्यात सदरील पैसे देण्याचे ठरले.

 एवढी माहिती पोलिसांना हाती आल्यानंतर पोलिसांनी लगेच आपला मोर्चा अनिता चा मोठा जावई भीवा थोरात त्याच्या कडे वळवला आणि त्याला औसा येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने कसलेही आढेवेढे न घेता आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. सासरा सारखे सारखे दारू पिऊन सासूबाईला भांडत असल्याचे व शेतजमीन बाहेर ठेवलेल्या बायांना देण्याचे त्याने कबूल केला होता, तसेच ती जमीन तो निश्चित देईल.असे वाटल्यावरूनच त्याचा काटा काढण्याचे ठरले होते.

दिनांक 14 मार्च रोजी जावई भीवा थोरात आणि त्याचा साथीदार यांनी श्रीमंत आळणे याचा पाठपुरावा करून तो कुठे कुठे जातो? याची माहिती घेतली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास श्रीमंत आळणे आपल्या दुचाकीवरून चलबुर्गा गावात न जाता थेट शेतातील शेड वर गेला. तो दारूच्या नशेत होता, भिवा आणि त्याच्या साथीदारांनी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शेतीच्या शेडवर जाऊन त्याची भेट घेऊन दारू पिण्याचा बहाणा करत दुचाकीवरून त्याला लामजना पाटी येथे आणले. मात्र अकरानंतर दारू दुकाने बंद झाल्याने त्यांना दारू मिळाली नाही. तेथील अवैध दारू विक्रे त्याकडेही त्यांनी संपर्क केला, मात्र तेथे दारू मिळाली नाही. दारू पाजून श्रीमंतचा काटा काढण्याचा कट त्या लोकांनी रचला होता, म्हणून ते तिघेही पुन्हा लामजना पाठीवरून औसा येथे आल्यानंतर तेथील एका हॉटेलमधून दारू विकत घेतली आणि पुढे एकाच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन दारू पीत बसले.रात्री खूप उशीर झाल्याने आता पाणी कुणाला मागावे?असे म्हणून कोरडी दारू प्यायला सुरुवात केली. श्रीमंत आळणे त्याने अगोदरच दारू खूप ढोसली होती. त्यामुळे त्याला दारुची झिंग लगेच चढली. तेवढ्यात भीवाच्या साथीदाराने जवळ पडलेली लोखंडी पाईप उचलला आणि श्रीमंत च्या डोक्यात मारला. लोखंडी पाइपचामार जोरात लागल्याने श्रीमंत आळणे जागेवरच आडवा झाला. तो शांत पडल्याचे पाहून त्याच्याजवळ असलेल्या भगवा रंगाच्या टॉवेलने त्याचा गळा आवळला.तो मेल्याची खात्री झाल्यानंतर त्याला उचलून खाली उतरवून घेतले. मोटारसायकल  वर त्याला बसवले आणि याकतपूर रस्त्यावर आणून तेथे निर्जनस्थळी त्याला टाकून दिले. अशी कबुली भिवा थोरात यांनी दिली. पोलिसांनी या खून प्रकरणात आरोपीने गुन्हा  करण्यासाठी वापरलेले लोखंडी पाइप, रक्ताने माखलेले कपडे, त्यावर पडलेल्या हाताचे ठसे हस्तगत केले. या संदर्भात आणखी आरोपी असण्याची शक्यता असल्याने औसा पोलीस अधिक तपास करत आहेत.

About The Author