बँक सभासदांच्या विश्‍वासाला सार्थ ठरविण्याचे काम संकटकाळातही करू

बँक सभासदांच्या विश्‍वासाला सार्थ ठरविण्याचे काम संकटकाळातही करू

एम.एन.एस.बँकेची वार्षीक सर्वसाधारण सभा : माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून पाच जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्र वाढलेले आहे. आता हे कार्यक्षेत्र राज्यभर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रस्तावित आहे. बँकेच्या माध्यमातून बचतगटाचे काम करणार्‍या 3500 महिलांना कर्ज देण्याचे काम केलेले आहे. तसेच बँकेच्या नफ्यातून आत्महत्याग्रस्त 110 कुटुंबियांना प्रत्येकी 10 हजाराची आर्थिक मदत देण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे एम.एन.एस.बँकेला ए ग्रेड मिळालेला आहे. त्यामुळे यापुढील कालावधीतही बँकेचे डिपॉझिट 500 कोटीपर्यंत वाढवून बँक सभासदांच्या विश्‍वासाला सार्थ ठरविण्याचे काम संकटकाळातही करू, असे प्रतिपादन महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते महाराष्ट्र नागरी सहकारी बँक,मर्या.लातूरच्यावतीने आयोजित 24 व्या वार्षी सर्वसाधारण सभेत ऑनलाईन कॉन्फ्रन्सिंगद्वारे बोलत होते. यावेळी एम.एन.एस.बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे, बँकेच्या संचालिका तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, संचालक सुभाषअप्पा सुलगुडले, संचालिका कौशल्या खोसे, तज्ज्ञ संचालक विश्‍वास जाधव, संचालक रविंद्र कांबळे, कार्यकारी संचालक अमरदिप जाधव, उपकार्यकारी संचालक बाळासाहेब मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना बँकेचे चेअरमन माजी आ.कव्हेकर म्हणाले बँकींग क्षेत्रामध्ये आर.बी.आय.चे अधिकार वाढले आहेत. राज्य सहकारी व जिल्हा सहकारवरती नाबार्डचे प्रशासकीय नियंत्रण होते. परंतु या नवीन कायद्यानुसार आता आर.बी.आय.चे नियंत्रण राहणार आहे. ऑडीटसाठीही आता सहकारी खात्याऐवजी आर.बी.आय.ची परवानगी घ्यावी लागणार आहे. याची अंमलबजावणी जून 2020 पासून सुरू झालेली आहे. महाराष्ट्राचा जी.डी.पी.2019-20 मध्ये 8.2 टक्के होता. तो आता (-78) वर आलेला आहे. त्यामुळे दरडोई उत्पन्‍न 2 लाख 2 हजार वरून 1 लाख 88 हजारावर आलेले आहे. भारताची परकीय गंगाजळी 586 अब्ज आहे. त्यामुळे भारत देशाचा जगामध्ये तिसरा क्रमांक आहे. आर.बी.आय.ने सी.आर.ए.आर. 9 टक्केपेक्षा, अशांचा अर्ज आल्यास शेअर्स परत करता येईल. याबरोबरच आर.बी.आय.बँकावरती बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, व्यवस्थापकीय मंडळ राहणार असल्याचेही ते म्हणाले.

एम.एन.एस.अ‍ॅडव्हांस आ.टी.सेंटरची स्थापना

महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचा एन.पी.ए.सन 2019-20 मध्ये 1.84 टक्के आहे. त्यामुळे बँकेचे अधिकारी, कर्मचार्‍यांचे आभार व्यक्‍त करीत भविष्यातही सभासदांचा आरोग्य विमा मायक्रो फायणांन्स व इतर सेवेच्या माध्यमातून बँकेच्या विकासकामाला गती देण्यासाठी अ‍ॅक्युट कंपनी सॉफ्टवेअर घेवून एम.एन.एस.अ‍ॅडव्हांस आय.टी.सेंटरची स्थापन केली आहे. या माध्यमातून नेट बँकींग, टेली बँकीग, आर.टी.जी.एस., एन.एफ.टीमुळे तात्काळ पैसे ट्रांन्सफर करण्याची प्रक्रिया याबरोबरच मोबाईल बँकींग व इंटनेट बँकींग व इंटरनेट बँकींग सेवा देण्यात येत आहे. जिल्ह्यातील इतर बँकापैकी आय.एफ.सी.कोट असणारी एम.एन.एस.बँक ही जिल्ह्यातील पहिली बँक असल्यामुळे शासकीय सबसिडी, मा.न्यायालयाच्या माध्यमातून येणारा निधी बँकेला घेता येतो, असेही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले.

About The Author