शिक्षणाधिकारी विशाल दशवंत यांनी केला शाळास्नेही बालरक्षकाचा सन्मान!
शिक्षकांनी शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे केले आवाहन
लातूर (प्रतिनिधी) : मुंबई येथील बालरक्षक प्रतिष्ठाणचा राज्यस्तरीय शाळास्नेही बालरक्षक सन्मान पुरस्कार लातूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा,नांदगाव येथील उपक्रमशील शिक्षक तथा बालरक्षक नजीऊल्लाह शेख यांना जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विशाल दशवंत यांनी समग्रशिक्षा अभियान विभागात आयोजीत कार्यक्रमात बालरक्षक नजीऊल्लाह शेख यांचा बुके व ग्रंथ भेट देवून सन्मान केला व मुंबई येथे दि. ०३ एप्रिल २०२१ रोजी आयोजीत कार्यक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे आवाहन केले.
सुरूवातीला समग्रशिक्षा अभियान टिमच्या वतीने नूतन शिक्षणाधिकारी म्हणुन पदभार स्विकारल्याने विशाल दशवंत यांचा लेखाधिकारी समग्रशिक्षा अभिजीत इटोलीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विवेक सौताडेकर यांनी केले तर आभार चंद्रकांत ठाकरे यांनी मानले.
यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी दिलीप हैबतपूरे, अधिक्षक मधूकर वाघमारे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी राजाभाऊ सूर्यवंशी, रजिया शेख, जिल्हा बालरक्षक समन्वयक चंद्रकांत ठाकरे, संशोधन सहाय्यक विवेक सौताडेकर, समन्वयक मूलींचे शिक्षण माळकर डी.एस., वरिष्ठ सहाय्यक जाधव शंकर, कनिष्ठ अभियंता सुरेखा सोनवणे, सहाय्यक लेखाधिकारी इमाम मुल्ला, महेश शिंदे, अंगद महानुरे आदींची उपस्थिती होती.