जिल्ह्यात 557 कोरोनाबाधित रुग्ण; 5 रुग्णाचा मृत्यु

जिल्ह्यात 557 कोरोनाबाधित रुग्ण; 5 रुग्णाचा मृत्यु

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात 557 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 5 रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात 468 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 176 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 1705 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 381 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 32220 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 4296 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 746 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 27178 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 272 आहे.

About The Author