दयानंद कला च्या किशोरी मुर्के ची ‘सुर नवा ध्यास नवा’ साठी निवड

दयानंद कला च्या किशोरी मुर्के ची 'सुर नवा ध्यास नवा' साठी निवड

लातूर (प्रतिनिधी) : कलर्स मराठी या वाहिनीवरील मराठी गीतांचा अत्यंत लोकप्रिय असलेला कार्यक्रम म्हणजेच ‘सुर नवा ध्यास नवा.’ या कार्यक्रमाचे चौथे पर्व दि 5 एप्रिल पासून सुरू होत आहे. या कार्यक्रमात दयानंद कला महाविद्यालयात बी. ए. प्रथम वर्षात संगीत विषयाचे अध्ययन करणाऱ्या कु किशोरी भुजंग मुर्के हिची निवड झाली आहे. ‘सूर नवा ध्यास नवा – आशा उद्याची’ हे चौथे पर्व महिला विशेष असणार आहे. या स्पर्धेसाठी गाण्याच्या ऑडिओ क्लिप्स मागवण्यात आल्या होत्या.हजारो युवती व महिलांनी याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.यातील निवडक गायिकांना मुंबई येथे बोलावून प्रत्यक्ष निवड चाचणी घेण्यात आली.या हजारो महिलांपैकी केवळ 16 युवती/ महिलांची निवड करण्यात आली आहे.या अंतिम 16 स्पर्धकांमध्ये किशोरी हिची निवड झाली आहे.
कु. किशोरी हिने यापूर्वी सह्याद्री वाहिनीवरील ‘वारे वा’ या कार्यक्रमात उत्तम सादरीकरण केले आहे. याचबरोबर विविध सांगीतिक स्पर्धांमध्ये सुद्धा तिने यश संपादन केले आहे. तिला बालपणापासूनच तिचे वडील सूरमणी भुजंग मुर्के झरीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

दयानंद कला महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या आत्तापर्यंत 15 विद्यार्थी कलावंतांची दूरदर्शनच्या विविध रियालिटी शोज व काहीजणांची चित्रपटात निवड झाली आहे. हीच देदीप्यमान परंपरा कु.किशोरीने पुढे चालू ठेवल्याबद्दल प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांनी तिचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य अनिल माळी, पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे, डॉ संदीपान जगदाळे,सुरमनी भुजंग मुर्के, डॉ रामेश्वर खंदारे, प्रा शरद पाडे, कार्यालयीन अधीक्षक श्री नवनाथ भालेराव आदी उपस्थित होते.

कु.किशोरीच्या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदराव सोनवणे, मा. ललितभाई शहा, प्रदीपकुमार राठी, सरचिटणीस रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव सुरेशजी जैन, कोषाध्यक्ष संजयजी बोरा, संगीत विभाग प्रमुख डॉ देवेंद्र कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.
‘सूर नवा ..’ या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेत्री स्पृहा जोशी या करणार आहेत तर संगीतकार अवधूत गुप्ते व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायक महेश काळे हे परीक्षक म्हणून असणार आहेत. दिनांक 5 एप्रिल पासून सुरू होत असलेल्या या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा व कु.किशोरी हिला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

About The Author