आजपासून मोठया ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये निर्बंध लागू

आजपासून मोठया ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये निर्बंध लागू

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हयात मागील काही दिवसांत कोविड-19 रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखणेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हयातील महानगरपालिका / नगरपरिषदा / नगरपालिका व त्यालगत 3 कि.मी. त्रिज्येमध्ये काही निर्बंध लावण्यात आले असून सदरील लावण्यात आलेले निर्बंध लातूर जिल्हयातील मोठया ग्रामपंचायतीमध्ये लागू करण्याची बाब जिल्हा प्राधिकरणाच्या विचारधीन होती.

त्यामुळे साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये लातूर जिल्हयातील महानगरपालिका / नगरपरिषदा / नगरपालिका व त्यालगत 3 कि.मी. त्रिज्येमध्ये लावण्यात आलेले निर्बंध जिल्हयातील खालील मोठे ग्रामपंचायत असलेल्या गावांमध्ये दि. 01 एप्रिल 2021 पासून 15 एप्रिल 2021 पर्यंत लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले आहे.
तालूका, ग्रामपंचायत व गाव पूढील प्रमाणे आहे. लातूर- मुरुड, औसा- किल्लारी, लामजना, उजनी, बेलकुंड, भादा, शिवली, लोदगा. रेणापूर-पानगाव, खरोळा, कारेपूर, पोहरेगाव, सिंदगाव, निलंगा-कासार शिरसी, औराद शाहजानी, देवणी- वलांडी, बोरोळ, जवळगा, तळेगाव, शिरुर अनंतपाळ-साकोळ, हिसामाबाद,(उजेड) येरोळ, उदगीर- वाढवणा, बु. तोंडार, नळगीर, सोमनाथपूर, मलकापूर, निडेबन, मादलापूर, हेर, हाळी, हंडरगुळी, नागलगाव, लोहारा, जळकोट-अतनूर, घोणसी, वांजरवाडा, अहमदपूर-शिरुर ताजबंद, किनगाव, हडोळती,खंडाळी, चाकूर-नळेगाव, वडवळ (ना.) चापोली, व आष्टा मोड.

उपरोक्त निर्बंध कोव्हिड-19 विषाणूच्या संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी दिनांक 15 एप्रिल 2021 पर्यंत लागू राहतील. सर्व संबंधित प्रशासकीय विभाग / संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी या आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी करावी.
या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुध्द दंडात्मक व साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005, फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 तसेच महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम, 2020 च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे ही आदेशात नमूद केले आहे.

About The Author