दापका येथे शाळेच्या ईमारतीचे भुमी पूजन कॅबिनेट मंत्री प्रभु चव्हाण यांच्या हस्ते संपन्न
दापका(एल.पी.उगीले) : सीमाभागातील बिदर जिल्ह्यामधील कमालनगर तालुका येथील चवर दापका येथील माध्यमिक शाळेच्या नवीन इमारतचे भूमीपूजन कर्नाटक राज्याचे पशुसंवर्धन मंत्री प्रभू चव्हाण यांच्या हस्ते ,दापका ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. महादेव मंदिरापासून शाळेपर्यंत लेझीमच्या पथकांनी व ढोल ताशांच्या गजरात पाहुण्यांचे शाळेत आगमनाने झाले. ना.चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. नंतर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक भानुदास वासरे यांनी शाले तर्फे सत्कार करण्यात आला. व प्राथमिक शाळेच्या मुख्याधिका सौ सुनंदा कोंगे, स्टाफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी प्राथमिक शाळेच्या स्टाफची संख्या, विध्यार्थी संख्या ,व इतर समस्याची विचारपूस केली. प्राथमिक शाळेच्या समस्याची लेखी स्वरूपात मागणी केली .प्राथमिक शाळेत 309 तर माध्यमिक शाळेची 200 विध्यार्थी संख्या आहे. त्यामुळे शाळेला लवकरात लवकर भौतिक सुविधा पुरविल्या जातील असे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांशी शाळेच्या प्रांगणात संवाद साधला व शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था निकृष्ट दर्जाची झालेली होती, ही बाब आमदारांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी शाळेसाठी चार खोलीची व्यवस्था व भौतिक सुविधा तात्काळ मंजुरीसाठी ठेवलेले आहे, व त्याचे काम चालू करण्यासाठी त्यांनी आणखी कोणती कमतरता असेल तर मला लेखी स्वरूपात द्या. तात्काळ त्याचा पुरवठा करू असे आश्वासन प्रभुजी चव्हाण यांनी सर्व दापकावाशी यांना दिले. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा शैक्षणिक अडचणी समक्ष जाऊन विचारले, आणि विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून शाळेला खेळाचे मैदान लवकरच देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. शैक्षणिक परिवर्तन हा माझा ध्यास आहे असे त्यांनी उद्गार काढले. त्यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक दापका ग्रामपंचायत सरपंच परशुराम डांगे , शालेय सुधार समितीचे अध्यक्ष अंकुशराव वाडीकर, सतीश पाटील, विलास भाऊराव जाधव (गुरुजी), रमेश पाटील,बाबुराव जाधव, पंचडे, योगेश पाटील , प्राथमिक शाळेचे अध्यक्ष गौस शेख, राजकुमार शेळके, जयपाल राठोड, सचिन राठोड, चन्नप्पा वडले. संजय कुमार मुर्के, शुभम पाटील, भगवानराव जाधव, अविनाश पाटील, किशनराव पाटील, तैमूर साहेब, गणपत नाईक, बहुतांश कारयकर्ते व प्राथमिक व माध्यमिक शाळेचे शिक्षकवृंद उपस्थितीत होते.
