छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेला लातूर जिल्हा क्रीडा संकुलावर अत्यंत उत्साही वातावरणात सुरुवात

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेला लातूर जिल्हा क्रीडा संकुलावर अत्यंत उत्साही वातावरणात सुरुवात

लातूर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे अत्यंत उत्साही वातावरणात खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते ध्वज फडकवून आणि क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून उद्घाटन करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समितीचे उपाध्यक्ष आमदार अमित देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, राज्य हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष विजय डांगरे, सचिव संजय नाईक, जिल्हा हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष मोईज शेख, सचिव दत्ता सोमवंशी, विभागीय क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू, विविध क्रीडा संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

राजस्थानातील कोटा शहराप्रमाणे लातूर हे शिक्षणासाठीचे प्रसिद्ध हब झाले आहे. आता विविध खेळात प्रविण्य मिळवून लातूर जिल्ह्याचे खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खेळ आणि खेळाडू यांना प्रोत्साहन देतात. त्यामुळे येत्या काळात खेळातही आपण उत्कृष्ट कामगिरी करूया, असा विश्वास खासदार सुधाकर शृंगारे यांनी व्यक्त केला. लातूर जिल्ह्यातील खेळासाठी, क्रीडापटूंसाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही देऊन या स्पर्धेसाठी लातूरमध्ये आलेल्या खेळाडूंचे त्यांनी स्वागत केले.

लातूरमध्ये आजपर्यंत अनेक राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या. लातूर हे खेळासाठी अत्यंत अनुकूल असा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले. लातूर जिल्ह्यात हॉलीबॉल तर अगदी खेड्यापाड्यात प्रसिद्ध असा खेळ आहे, असे सांगून यासाठी राज्याची हॉलीबॉल प्रबोधिनी लातूरमध्ये व्हावी, अशी मागणी या स्पर्धेच्या आयोजन समितीचे उपाध्यक्ष आमदार अमित देशमुख यांनी यावेळी केली.

देशात खेलो इंडियासारख्या स्पर्धामुळे खेळाला अतिशय पोषक वातावरण तयार झाले असून आता तालुका पातळीपर्यंत क्रीडा संकुल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खेळाला नेहमीच प्रोत्साहन देतात, खेळ आणि खेळाडुंचा सन्मान करतात. यापुढे अशा स्पर्धांचे वारंवार आयोजन करावे. त्यातून जिल्ह्यातील विद्यार्थी खेळाकडे आकर्षित होतील, असे प्रतिपादन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले. तसेच या राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनाची संधी लातूरला दिल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांचे आभारही मानले.

या स्पर्धेमध्ये राज्यातील आठ विभागाच्या 21 व 18 वर्षांखालील मुला-मुलींचे एकूण 32 संघातील 448 खेळाडू, व्यवस्थापक व क्रीडा मार्गदर्शक सहभागी झाले आहेत. तसेच जवळपास दीडशे तांत्रिक समिती सदस्य, अधिकारी, पदाधिकारी व स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.

प्रास्ताविक क्रीडा विभागाचे उपसंचालक सुधीर मोरे यांनी केले. सूत्रसंचालन गालिब शेख यांनी केले, जिल्हा हॉलीबॉल संघटनेचे सचिव दत्ता सोमवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

रोमहर्षक खेळाने जिंकली प्रेक्षकांची मने

उद्घाटन समारंभानंतर विविध खेळाचे सादरीकरण करण्यात आले. त्यात महाराष्ट्राचा पारंपारिक मलखांब या खेळातील चित्तथरारक प्रात्यक्षिक मुले आणि मुलींनी दाखविली. देशीकेंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी काठी लोकनृत्य करून प्रेक्षकांची मने जिंकली.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!