अखेर सत्याचा विजय झाला, धनुष्यबाण शिंदे यांनाच – एड. गुलाब पटवारी

अखेर सत्याचा विजय झाला, धनुष्यबाण शिंदे यांनाच - एड. गुलाब पटवारी

उदगीर (एल.पी. उगिले) : शिवसेना अंतर्गत वाद चालू असतानाच शिवसेनेचे चिन्ह असलेले “धनुष्यबाण” बाळासाहेबांची शिवसेना या गटाला देण्यात आले आहे. यासंदर्भात बोलताना बाळासाहेबांची शिवसेना लातूर जिल्हा संघटक ज्येष्ठ विधिज्ञ गुलाब उर्फ बापूराव पटवारी यांनी स्पष्ट केले की, “सत्य परेशान होता, है पराभूत नही!”हे सिद्ध झाले आहे. शिवसेनेतील बहुसंख्य लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार तसेच स्थानिक पातळीवर कार्यकर्तेही बाळासाहेबांची शिवसेना हाच राजकीय पक्ष खरा आहे. हे मान्य करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे विकासाची धडाडी घेत महाराष्ट्राला गतिमान करणारे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने चिन्हाचा निकाल लागला असून, शिवसैनिकांमध्ये उत्साह पसरला आहे. हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी ठीक ठिकाणी शिवसैनिकांनी पेढे वाटून तसेच फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

About The Author

error: Content is protected !!