1404 कोरोनाबाधित रुग्ण; 4 रुग्णांचा मृत्यु

1404 कोरोनाबाधित रुग्ण; 4 रुग्णांचा मृत्यु

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 31410 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 1404 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 4 रुग्णाचा मृत्यु झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात 2200 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 432 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 3650 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 972 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 40531 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 8324 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 797
रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 31410 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 523 आहे. आरटिपीसीआर मधील 1343 अहवाल प्रलंबित आहेत.

About The Author