ग्रामपंचायत सावरगाव येथे जागतिक महिला दिन साजरा

ग्रामपंचायत सावरगाव येथे जागतिक महिला दिन साजरा

देवणी (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त सावरगाव ग्रामपंचायत येथे स्त्री शिक्षणाचे प्रणिती थोर समाज सेविका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महिला दिनाचे औचित्य साधून शिक्षण आरोग्य समाजसेवा महिला बचत गट स्वच्छता विभागात कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार सरपंच सौ. सत्यभामा मसुरे, उपसरपंच स्वाती जोळदापके, सहाय्यक विस्तार अधिकारी कट्टेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शैक्षणिक कार्यासाठी सौ. शशिकला बिरादार, वर्षा गिरी यांचा महिला बचत गट या कार्यासाठी सारिका सावरगावकर व शुभांगी देशपांडे व स्वच्छतेसाठी सत्यभामा सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी प्राथमिक आरोग्य वर्धनी केंद्र सावरगाव येथील कर्मचारी सावरगाव नगरीतील महिला व पुरुष यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, आभार ग्रामसेवक श्री मुर्के यांनी मांडले.

About The Author

error: Content is protected !!