डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन
सम्राट मित्रमंडळाचा उपक्रम
अहमदपूर(गोविंद काळे) : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील सम्राट मित्रमंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी एक प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्वच सामाजीक,सांस्कृतिक उपक्रमावर बंदी घातली आहे.तसेच जमावबंदी आदेश दिल्याने पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्रीत जमन्यावर सूध्दा प्रतिबंध घातला आहे.ही बाब लक्षात घेवून यंदा रक्तदानासारख्या उपक्रमाने महामानवाची जयंती साजरी करण्यासाठी सम्राट मित्रमंडळाच्या वतीने ठरविण्यात आले.आज सर्वत्रच कोरोनामूळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून रक्ताची सूध्दा खूप गरज भासते आहे. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याबाबत शासनाने सूध्दा वेळोवेळी अवाहन केले आहे. रूग्णांची रक्ताची गरज भागविण्यासाठी भव्य रक्तदान शिबीरास आयोजन केले आहे.
तरी तमाम समतावादी नागरिकांनी दि.14 एप्रील 2021 रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर महामानवाच्या जयंतीनिमित्त रक्तदान करून बाबासाहेबांना खर्या अर्थाने अभिवादन करावे तसेच कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच या शिबिरात सहभागी व्हावे व रक्तदान करण्यासाठी नांव नोंदणी करावी असे अवाहन संयोजन समितीच्या वतीने युवक नेते डाॅ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी, अरूणभाऊ वाघंबर, अँड.सुभाषराव सोनकांबळे, जीवन गायकवाड,प्रशांत जाभाडे, शरद सोनकांबळे, शरद कांबळे, शिवाजीराव भालेराव, अजय भालेराव, बालाजी मस्के,शेख मतीन,सय्यद तरबेज,पठाण मोहम्मद, नूर मोहम्मद, सय्यद नौशाद, विजय भालेराव, शरद बनसोडे, दिलीप भालेराव, सचिन बानाटे आदींनी केले आहे.