यशवंत विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा

यशवंत विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन दिनानिमित्य मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या समयी श्री गंपले म्हणाले की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जीवनभर संघर्ष करून शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला म्हणूनच आज देशामध्ये सर्व क्षेत्रात मुली अग्रेसर असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम तत्तापूरे यांनी सुत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी तर आभार शरद करकनाळे यांनी मानले. यावेळी उपमुख्याध्यापक उमाकांत नरडेले, पर्यवेक्षक दिलीप गुळवे, बालाजी माळी, प्रतिभा सोलपुरे, मेघा देशमुख, प्रभावती मिरजकर ,भीमराव कांबळे, सह विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षणप्रेमी नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!