यशवंत विद्यालयात गणित प्राविण्य परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार संपन्न

यशवंत विद्यालयात गणित प्राविण्य परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : गणित प्राविण्य परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करणाऱ्या कु. श्रुती कांबळे, श्रवण चौधरी, कु. ज्ञानदा दाचावार, कु. गायत्री कोपले, अनिकेत बावगे, प्रणव लद्दे, स्नेहा भिकाने, स्वप्निल केंद्रे, कु. वैष्णवी पुणे, सोहम देशमुख, शिवराज केंद्रे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य व्ही व्ही गंपले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा समन्वयक विजय किल्लचे, सदस्य शिवानंद उंदीर कल्ले,जिलानी शेख, उप मुख्याध्यापक उमाकांत नरडेले, पर्वेक्षक दिलीप गुळवे, राम तत्तापुरे, गुरप्पा बावगे, संतोष मालवदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार बोराळकर यांनी तर आभार गौरव चवंडा यांनी मांनले. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक व शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणित अध्यापक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व यशवंत विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिसर घेतले.

About The Author

error: Content is protected !!