अरविंद पाटील नीलांगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त देवनी बस स्थानकामध्ये पाणपोईचे उद्घाटन

अरविंद पाटील नीलांगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त देवनी बस स्थानकामध्ये पाणपोईचे उद्घाटन

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी बस स्थानकामध्ये प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची अडचण होत होती, ही अडचण लक्षात घेऊन भाजपाचे अरविंद पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त पाणपोईचे उद्घाटन ज्येष्ठ नेते हवगीराव पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे देवणी तालुकाध्यक्ष काशिनाथरावजी गरीबे, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष अलिमभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते अशोक अण्णा लुल्ले, डेपो मॅनेजर बिरादार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते, देवणी बस स्थानकामध्ये पाणपोई चालू केल्याने वर्षांना आता उन्हाळ्यात थंडगार पाणी पिण्यास मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशातून आनंद व्यक्त केला जात आहे.

About The Author

error: Content is protected !!