केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांच्या हस्ते सत्कार

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांच्या हस्ते सत्कार

लातूर (दयानंद स्वामी) : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे लातूर दौर्‍यावर आले असता भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी त्यांचा शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले यांचा 1990 मध्ये महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात समावेश झालेला होता. त्यांनी समाजकल्याण आणि परिवहन मंत्री म्हणून काम केलेले आहे. तसेच मुंबई आणि पंढरपूर या दोन मतदार संघातून दोन वेळा खासदार झाले. रामदास आठवले साहेब कव्हेकर साहेबांच्या 2004 च्या विधानसभा प्रचारसभेस लातूर येथे आले होते. परंतु सध्या 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री ते सक्रीयपणे कार्यरत आहेत. ते एका विशेष कार्यक्रमानिमित्त लातूर दौर्‍यावर आले असता लातूर येथील शासकीय विश्रामगृहावर भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आठवले साहेबांबरोबर कव्हेकर साहेबांची लातूर जिल्हा व महाराष्ट्रातील विविध राजकीय प्रश्‍नांसंदर्भात चर्चा झाली. त्यास सकारात्मक प्रतिसाद आठवले साहेबांनी दिल्याचे कव्हेकर साहेबांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या राजकीय पक्षाचे सरचिटणीस चंद्रकांत चिकटे, भाजपा ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जेएसपीएमचे संस्थेचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!