निडेबन आंगणवाडी क्रमांक-१ येथे आरोग्य शिबीर अंतर्गत आरोग्य तपासणी

निडेबन आंगणवाडी क्रमांक-१ येथे आरोग्य शिबीर अंतर्गत आरोग्य तपासणी

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील निडेबन आंगणवाडी क्रमांक-१ येथे सामान्य रूग्णालय उदगीर व शिवशांती सेवाभावी संस्था निडेबन तसेच जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला पंधरवडा दिनानिमित्त आरोग्य शिबीर घेण्यात आले. त्यात रक्तातील विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक संरक्षण परिषेदेचे अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर हे होते.तर प्रमुखपाहुणे म्हणून संदीप शेल्हाळकर, सोनाली हल्लाळे, लक्ष्मी सुर्यवंशी, विश्वजीत मोगले, शिवशांती सेवाभावी संस्थेच्या सचिव सौ.चंचला शिवाजी हुगे उपस्थित होते.

या तपासणीत रक्तदाब, एड्स, महिलांच्या शरिरातील रक्ताचे प्रमाण, रक्तदाब, थायरॉईड, रक्तातील साखरेचे प्रमाण, शुगर व ईत्तर तपासणी संजिवनी क्लिनिक लॕबरॉटरीज उदगीर यांच्या मार्फत करण्यात आली. यावेळी ६० महिलांची आरोग्याची व रक्तातील विविध आजारांची तपासणी केली.

या शिबिरात संजिवनी लॕबरॉटरीज यांच्या मार्फत सर्वप्रकारचे आजाराची मोफत तपासणी करुन मोफत उपचार करण्यात आले. तसेच ई.सी.जी., ब्लड प्रेशर, रक्तातील साखरेचे प्रमाण याची मोफत तपासणी व उपचार केले. तसेच नियमानुसार महात्मा जोतिबा फुले योजनेत टेस्ट अॅन्जीग्राफी व अॅन्जीओप्लास्टी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कराव्यात असे आवाहन ग्राहक संरक्षण परिषेदेचे अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी उपस्थित महिलांना केले. शिबीर यशस्वीतेसाठी आंगणवाडी कार्यकतीॅ सौ.सी.एस.हुगे, मदतनिस उषा नामेवार यांनी विशेष प्रयत्न केले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!