संत ज्ञानेश्वर विद्यालय खरी कमाई उपक्रम

संत ज्ञानेश्वर विद्यालय खरी कमाई उपक्रम

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात स्काऊट गाईड, कब बुलबुल पथकाच्या वतीने नुकतीच खरी कमाई उपक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे व प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव शृंगारे उपस्थित होते.प्रारंभी स्काऊट मास्टर सतीश साबणे तसेच गाईड कॅप्टन संजीवनी गुरमे यांनी पथकातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष व प्रमुख पाहुण्याने विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व पैशाच्या देवघेवची माहिती दिली. व स्टॉलचे उद्घाटन अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. तदनंतर विद्यार्थ्याने आपापले स्टॉल मांडून खाऊ ची आपल्या सहकारी वर्गमित्रांना व पालकांना विक्री केली. या जवळपास 101 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. शाळेतील सर्व विद्यार्थी वर्ग मित्रांनी, शिक्षकांनी व पालकांनीही खाऊ विकत घेऊन विविध पदार्थांचा आस्वाद घेतला.खरी कमाई उपक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. पालक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!