नागझरीच्या कविता उगीले यांना समाज प्रभोधणी गुणगौरव पुरस्कार

नागझरीच्या कविता उगीले यांना समाज प्रभोधणी गुणगौरव पुरस्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : जागतिक महिला दिनानिमित्त अहमदपूर येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने महिलांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या मध्ये कर्तुत्वान महिलांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. नागझरी येथील आशा कार्यकर्ती, यांनी कोविड 19 काळात जीवाची पर्वा न करता वेळेवर तपासणी करणे, रुग्णांना औषध देणे, वेळोवेळी सरकारच्या सूचनांचे पालन करुन गावात कोविड चे रुग्ण वाढू दिले नाहीत. तसेच गरोदर महिला, लहान बाळ यांना वेळोवेळी लशी देणे, वयस्कर व्यक्तींना औषद उपचार करणे हे सर्व कामे करत करत शेतात कामे करुन गरज पडली तर मोलमजुरी करुन मुलांना उच्च शिक्षित केलें अशा क्रातत्वन महिला कविता नागनाथ उगिलें याचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य चे माजी मंत्री बाळासाहेब जाधव, अड. रमेश राठोड, रेखाताई तरडे, संगीता खंडागळे, अनुराधा नालेगवकर, मोहिब कादरी, मंजुषा निंबाळकर, रत्नाकर नलेगावकर, राम तत्तपुरे, उधव इप्पर, संचालक ज्ञानदीप अकॅडमी, आयोजक मेघराज गायकवाड इ. मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला.

About The Author

error: Content is protected !!