अहमदपूर येथे आ.अमित देशमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

अहमदपूर येथे आ.अमित देशमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आ.अमित देशमुख यांचा वाढदिवस अहमदपूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला.श्रीक्षेत्र परचंडा येथे रोकडोबाला अभिषेक करून आ.देशमुख यांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.अहमदपूर येथे पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.ज्ञानेश्वर मतिमंद विद्यालय अहमदपूर येथे विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.गणेश कदम, जिल्हा सरचिटणीस सांब महाजन,जेष्ठ नेते भारत रेड्डी, कलीमोदीन अहमद, हेमंत माकणे, चंद्रकांत मद्दे, निलेश देशमुख, शिवाजीराव जंगापल्ले, विकास महाजन, अक्षय देशमुख, अनिल शेळके, बापूराव शिंदे, उत्तमराव टेकाळे, किशोर मोरे, अल्ताफ शेख, रामानंद घोगरे, प्रकाश ससाने,प्रदिप डावरे, फेरोज अहमद, अक्षय लांडे, धीरज काळे, अक्षय काडवादे, रुपेश कांबळे, गुणाजी भगत यांच्या सह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!