संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे आँलिम्पियाड परीक्षेत यश

संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे आँलिम्पियाड परीक्षेत यश

अहमदपूर (गोविंद काळे) : संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एजूहेल फाउंडेशन इन्टरँकटिव्ह ओलंपियाड परीक्षेत यश संपादन केले आहे. अविराज राठोड, आदिती राठोड, श्लोकराज टाळकुटे, शौर्यराज टाळकुटे, श्रेयस देशमुख, प्रसाद बैकरे, जान्हवी डांगे, तन्वी पस्तापुरे, प्रांजल मुसणे, बालाजी चंदेवाड ,माही सांगुळे ,अपूर्वा देशमुख आदी विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले तर अरिफ शेख, सानिका खुर्दळे, आकांक्षा जाधव यांनी रौप्य पदक प्राप्त केले आहे. कांस्यपदकासाठी संकर्षण पलमटे, देवेंद्रसिंह लोहकरे ,आराध्या राठोड, शुभ्रा भोंग, वेदांत घोगरे, आयुष पौळ यांनी यश मिळवले आहे. या परीक्षेसाठी विद्यालयाचे एकूण 50 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी वरील विद्यार्थ्यांची एप्रिल 2023 मध्ये होणाऱ्या सेकंड लेव्हलला निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना अश्विनी घोगरे, शबाना शेख ,त्रिगुणा मोरगे, सतीश साबणे, प्राजक्ता भोसले, सविता पाटील, शारदा तिरुके, संजीवनी गुरमे यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष गणेश दादा हाके पाटील संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे, मुख्याध्यापिका आशाताई रोडगे, मुख्याध्यापक उद्धव शृंगारे सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

About The Author

error: Content is protected !!