विज पडुन मृत्यु झालेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयां मदत

विज पडुन मृत्यु झालेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयां मदत

चाकूर (गोविंद काळे) : चाकूर शिवारात विज पडुन मृत्यु झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तिर्थवाडी येथे सोमवार दि.20 रोजी प्रशासनाच्या वतीने चार लाख रूपयांचा धनादेश देवुन मदत करण्यात आली.

चाकूर शिवारात गट क्र.622/1/2 मध्ये नागभुषण विश्वनाथ पाटील (वय 57 वर्षे)(रा.तिर्थवाडी) हे काम करीत असताना शुक्रवार दि.17 रोजी सायंकाळी 5.30 वा.च्या सुमारास विजाच्या कडकडाटासह पाऊस पडला.यावेळी अंगावर विज पडुन नागभुषण विश्वनाथ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवार दि.18 रोजी पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके आदिनी विज पडुन मृत्यु झालेल्या शेतक-यांच्या कुटुबियाची तिर्थवाडी येथे जाऊन भेट घेतली.व सर्वोत्परी मदत करण्याचे आश्वासन दिले होते.सोमवार दि.20 रोजी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी,तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे,प्रशिक्षणार्थी तहसीलदार निलेश होनमोरे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके आदिनी विज पडुन मृत्यु झालेल्या शेतक-यांच्या कुटुबियांना तिर्थवाडी येथे जाऊन भेट घेतली व त्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रूपयांचा धनादेश देवुन मदत केली.यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून सर्वोत्परी मदत करणार असल्याचे सांगीतले.यावेळी उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार, माजी उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर, उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!