अवकाळी पाऊस गारपीटीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान

अवकाळी पाऊस गारपीटीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान

भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्याकडून पाहणी

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील चोबळी मोरेवाडी – माकणी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथे दिनांक 18/03/2023 रोजी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस गारपीट मुळे शेतीपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे .त्यावेळी प्रत्यक्ष शेतीची पाहणी करत असताना गहू -ज्वारी – टमाटा -भाजीपाला -फळबाग आधी पिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून शासनाकडे भरपाई करिता पाठपुरावा करण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष हनमंतराव देवकते, भाजपा तालुका उपाध्यक्ष तथा पत्रकार बालाजी पडोळे, रमेश पाटील ,अण्णाराव सिताराम पाटील यांच्या शेतीत जाऊन पहाणी केली त्यावेळेस गावातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते .शेतकरी चेअरमन बालासाहेब अण्णाराव पाटील ,माजी सरपंच शिवराज कापसे, माजी सरपंच संजय पाटील ग्रा प स शिवराज आबदे बलभीम पाटील बालाजी पाटील उमाकांत मासुरणे पंडित मजगे मनमत पंढरी आबदे मारुती बाबाराव चोबळे आबदे पंडित पाटील युनुस सय्यद पंढरी मासुरणे विठ्ठल पाटील आधी शेतकरी उपस्थित होते त्यावेळी ज्वारी भाजीपाला टमाटा पाहणी करण्यात आली चोबळी मोरेवाडी गावातील शेतकऱ्यांची शेतकरी मोठे नुकसान झालेले आहे . तसेच माकणी येथे शेतकरी प्रभाकर येरमे यांच्या शेतावर जावून ज्वारी व अंबे पिकाचे पाहणी झाली. आंब्याचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतकरी आणाराव जाधव यांच्याही ज्वारी पिकांचे अत्यंत नुकसान झालेले दिसले . शेतकरी बाळू जाधव यांच्याही ज्वारी पिकांचे नुकसान झाले आहे . चोबळी – माकणी शिवारात शेकडो एकर मध्ये नुकसान झाले आहे . तलाठी गुडे कृषी सहाय्यक रेड्डी यांना सुचना करून पंचनामे करण्याचे आदेश भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी दिले . शिरूर ताजबंद, अंबेगाव, बोडका, सयदपूर, उमरगा ( ये ), तेलगाव अजनी सलगर आदी भागात अवकाळी पाऊस गारपिट झाली आहे.

About The Author

error: Content is protected !!