नुकसान भरपाई मिळावी यासाठी आ.बाबासाहेब पाटील यांचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन
अहमदपूर (गोविंद काळे) : चाकूर व अहमदपूर मतदारसंघातील परिसरात गारपीट झाल्याने रब्बी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावून घेतला आहे. याबाबत अहमदपूर चाकूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री मा.ना.गिरीषजी महाजन यांना भेटून निवेदन दिले.प्रसंगी त्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करण्याचे निर्देश देऊन सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले.यावेळी खासदार सुधाकरराव शृंगारे,आमदार रमेश अप्पाजी कराड, जिल्हाधिकारी बी पी पृथ्वीराज, मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यावेळेस उपस्थित होते.
