कमलनगर येथे हमीभाव (नाफेड) केंद्राकडून हरभरा केंद्रास सुरुवात

कमलनगर येथे हमीभाव (नाफेड) केंद्राकडून हरभरा केंद्रास सुरुवात

कमालनगर (एल.पी.उगीले) : सीमा भागातील बिदर जिल्ह्यातील कमालनगर तालुका येथे नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आले. हे खरेदी केंद्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या हमीभावा प्रमाणे कमालनगर शेतकरी उत्पादक कंपनी द्वारे कंपनीच्या संचालकांकडून त्यांच्या सभासद शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आले आहे. या आगोदर औराद व कमालनगर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून त्यांचे उत्पादन उदगीर येथील बाजारात जात होते. कमालनगर शेतकरी उत्पादक कंपनी या केंद्राची सुरूवात केल्यामुळे शेतकऱ्यांना खुप मोठा लाभ मिळणार असून त्यांना हमीभाव मिळाल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात मदत होईल. कंपनीच्या राबल्या जाणाऱ्या विविध उपक्रमामुळे सीमाभागातील सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल. अशी अपेक्षा कंपनीच्या संचालकांकडून व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती औराद चे अध्यक्ष रंगराव जाधव, कमालनगर PKPS चे अध्यक्ष गंगप्पा बोरोळे, सभासद माधवराव चांगुणे, विठ्ठल पाटील बालूर, भाजप चे युवा नेते शिवकुमार वड्डे, विश्वनाथ नवाडे, माजी मुख्याध्यापक मनोहरराव जाधव व रामराव सुर्यवंशी, होरांडी चे शेतकरी सभासद रमेश पाटील, माधवराव खोंडे, ज्ञानेश्वर हीप्पळगावे, फलोत्पादक अधिकारी सचिन पाटील, शिवकुमार पत्रे, चोंडीमुखेड येथील शेतकरी संदीप रक्षाळे, सचिन जाधव, नितीन जाधव, नागेश चांडेश्वरे हे उपस्थित होते. यावेळी कंपनीचे संचालक अंकुश वाडीकर, बालाजी जाधव, प्रदीप बिरादार यांनी शेतकऱ्यांचे आभार व्यक्त केले.

About The Author

error: Content is protected !!