गुढीपाडव्यानिमित्त मुक बधीरांना अन्नदान करून वाढदिवस साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : वाढदिवस म्हणटले की हारतुरे,केक मौज मस्ती असा वायफळ खर्च करीत लोक आपला वाढदिवस साजरा करतात. या सर्व गोष्टीना फाटा देत, उदगीर येथील उद्योजक जयवंतराव औटे पाटील यांच्या ६३ व्या वाढदिवसा निमित्त येथील पांडुरंग निवासी मतीमंद विद्यालयातील लहान मुलांना एखाद्या समारंभात पाहुण्यांचा मान सन्मान करतात, त्याच प्रमाने या मुकबधीर बालकांचा सन्मान करीत, भाजयुमोचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी मुकबधीर मुलां सोबत गुढीपाडवा व उद्योजक जयवंतराव पाटील यांचा वाढदिवस साजरा केला. पाटोदे यांच्या या उपक्रमा बध्दल मराठी माणसाचा वाढदिवस आणि मराठी नव वर्षाची सुरूवात, अन्नदानाने केल्यामुळे उदगीर व उदगीर परिसरात त्यांच्या या उपक्रमाचे कोतुक होत आहे. यावेळी तरूण उद्योजक बिपीन पाटील, बाळासाहेब पाटोदे, सतीश पाटील मानकीकर, राजकुमार मोगले, अंकुश ताटंमपल्ले,राजु घोरपडे, अजिंक्य पाटील, हिमांशु पाटील, पंकज कालानी, राहुल अतनुरे,विकास बिरादार, पुंडलिक जाधव, श्रीकांत घोरपडे,शिक्षक व्ही पी अलट, म्हेत्रे के एन,देवकत्ते व्ही पी, राठोड बंडु यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
