समर्थ धोंडूतात्यांचा वार्षिक उत्सवाला सुरुवात, शनिवारी काल्याच्या कीर्तनाने सांगता

समर्थ धोंडूतात्यांचा वार्षिक उत्सवाला सुरुवात, शनिवारी काल्याच्या कीर्तनाने सांगता

उदगीर (एल.पी.उगीले) : मराठवाड्याचे प्रतिपंढरपूर व महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामीण तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा प्राप्त असलेल्या उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी येथील समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या ९१ व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व वार्षिक उत्सव यात्रेला प्रारंभ झाला असून, या उत्सवाची सांगता ह.भ.प. ज्ञानोबा माउली अर्बुजवाडीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.सध्या दररोज धोंडूतात्या महाराजांच्या मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, दुपारी 1 ते 2 धोंडूतात्या महाराजांचे जीवनचरित्र वाचन, वाचकह.भ.प.गोपाळ ठाकूर तर सुचक तुळशीदास मुंडे, दुपारी २ ते ५ वाजे पर्यंत भागवताचार्य ह.भ.प. अंजलीताई अर्जुन केंद्रे यांची भागवत कथा, तर रात्री कीर्तन, ह.भ.प. नाथ महाराज पंढरपूर, प्रकाश महाराज साठे, सोपान महाराज सानप, हिंगोलीकर, ह.भ.प.शिवाजी महाराज बावसकर, ह.भ.प. कैलास महाराज लिंगदाळकर, २३ रोजी बाळू महाराज गिरगावकर, २४ रोजी विजयानंद महाराज सुपेकर यांचे दुपारी २ ते ४ गुलालाचे कीर्तन व महाप्रसाद आहे. रात्री ह. भ. प. शिवाजी बावसकर यांचे कीर्तन झाले तर दि.२५ रोजी ज्ञानोबा माउली महाराज अर्बुजवाडीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने व श्री समर्थ धोंडुतात्या महाराज यांची पालखी मिरवणुकीने या उत्सवाची सांगता होणार आहे.भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन देवस्थान कमिटीचे विश्वस्थ व्यंकटराव मुंढे, बाबूराव घटकार व समस्त ग्रामस्थांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!