परचंडा गावांने उभारली स्वच्छ परचंडा सुंदर परचंडा आणि विकासाची गुढी
परचंडा (गोविंद काळे) : परचंडा गाव हे अहमदपूर तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी ग्रामविकासाची अनेक कामे झालेली आहेत. अनेक वेगवेगळे उपक्रम ग्रामपंचायत कार्यालयातर्फे राबविले जातात या गुढीपाडव्याला सर्वांना “स्वच्छ परचंडा व सुंदर परचंडा गुढी” असा उपक्रम गावकऱ्यांना सुचविला होता. त्याप्रमाणे सर्वांनी आपल्या गुढीवर स्वच्छ परचंडा व सुंदर परचड्याची टोपीपी घालून गुढी उभा करून त्याची पूजा करण्यात आली. याप्रमाणे सर्व गावकऱ्यांना आपल्या घरासमोरील आजूबाजूचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले होते उदंड प्रतिसाद गावकऱ्या तर्फेमिळाला प्रत्येक घराघरांमध्ये समृद्धीची गुढी उभारण्यात आली त्याबद्दल समस्त गावकरी मंडळींचे ग्रामपंचायत कार्यालय परचंडा तर्फे खूप अभिनंदन करण्यात आले.
परचंडा गावामध्ये गेल्या दोन वर्षापासून ग्रामविकासाचे मोठ्या प्रमाणात काम उभारण्यात आले आहे.सर्व गावात ३५ सीसीटीव्ही बसवून फुटेज मध्ये आणण्यात आलेली आहे. गावात प्रत्येक पोलवर साऊंड बसवण्यात आले आहे त्यानुसार दररोज सकाळी आठ वाजता सामूहिक राष्ट्रगीत होते. बंदिस्त नाल्या, वृक्षारोपणाचे कामही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे शोषखड्डा, स्वच्छता, घनकचरा, पाणी व्यवस्थापन इत्यादी बाबतीत सूक्ष्म नियोजन करून योजना राबविण्यात आलेली आहे आज पर्यंत 500 ब्राशचे काम पेव्हर ब्लॉक करण्यात आले आहे सुसज्ज ग्रामपंचायतची बिल्डिंग बालोद्यान, स्वच्छ रस्ते, स्वच्छ नाल्या अशा विविध गोष्टीवर सूक्ष्म नियोजन करून गावातील विकास कामे करण्यात आलेली आहेत प्रत्येक विकास कामांमध्ये व ग्रामपंचायत तर्फे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमात मध्ये प्रत्येक विकास कामांमध्ये व ग्रामपंचायत तर्फे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये गावकऱ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतो लोकसहभाग मिळतो ही महत्त्वपूर्ण बाब आहे डिजिटल जिल्हा परिषद, डिजिटल अंगणवाडी, सुंदर असे समाज मंदिर गावात भरपूर प्रकाश व घरोघरी वेळापत्रकानुसार पाणी अशी अनेक प्रकारची उपक्रमी उपक्रम व विकास कामे राबवण्यात आलेली आहेत.
