शहीद दिनानिमित्त महात्मा फुले महाविद्यालयात शहिदांना अभिवादन
अहमदपूर (गोविंद काळे) : शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्यासह भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात शहीद झालेल्या अज्ञात अज्ञात वीरांना येथील महात्मा फुले महाविद्यालयात विनम्र अभिवादन करण्यात आले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात शहिदांच्या प्रतिमांचे पूजन करून शहिदांना अभिवादन करण्यात आले यावेळी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले. यावेळी डॉ. सतीश ससाणे,डॉ. अनिल मुंढे, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. मारोती कसाब, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. संतोष पाटील, डॉ. सचिन गर्जे, ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे प्रमुख श्री प्रशांत डोंगळीकर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
