कोरोनाचा वेग वाढला 1916 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनाचा वेग वाढला 1916 कोरोनाबाधित रुग्ण

418 अहवाल प्रलंबित

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 34057 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 1916 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

लातूर जिल्ह्यात केवळ 747 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 154 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तसेच प्रलंबित मधील 567 कोरणा बाधित रुग्ण आढळून आले आहेत . 3480 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 1195 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46818 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 11948 आहे.

लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 813 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 34057 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 662 आहे. आरटिपीसीआर मधील 418 अहवाल प्रलंबित आहेत.

About The Author