पोलीस फ्लॅश न्युज बातमीच्या दणक्याने अखेर लाखो लिटर पाण्याची नासाडी थांबली

पोलीस फ्लॅश न्युज बातमीच्या दणक्याने अखेर लाखो लिटर पाण्याची नासाडी थांबली

लामजना येथील वार्ड क्रमांक 2 मधील पाण्याच्या टाकीला बसवण्यात आल्या तोट्या

लामजना (कैलास साळुंके) : तालुक्यातील ‘लामजना गावातील वार्ड क्रमांक 2 मधील टाकीला तोट्या नसल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी’ या मथळ्याखाली पोलीस फ्लॅश न्युज ने लामजना येथील ग्रामस्थांच्या अडचणी लक्षात घेऊन वस्तुनिष्ठ वृत्त दिले होते.

लामजना गावातील वार्ड क्रमांक 2 मधील सुतार यांच्या घराजवळच्या टाकीच्या तोट्या खराब होण्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत होती. त्या टाकीचे वाया जाणारे पाणी नालीत तुंबून प्रचंड दुर्गंधी पसरत होती. यामुळे वार्ड क्रमांक 2 मधील नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

संबंधित टाकीच्या तोट्या दुरुस्ती बाबत विचारणा केली असता ग्रामपंचायत कडून सर्वसामान्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. त्रस्त झालेल्या नागरिकांनी पोलीस फ्लॅश न्युज टीम ला संबंधित गैरप्रकार कळवला. पोलीस फ्लॅश न्युज कडून संबंधित वस्तुनिष्ठ वृत्त प्रकाशित करताच ग्रामपंचायतला जाग आली व त्यानंतर सरपंच खंडेराव फुलारी, उपसरपंच बालाजी पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी सिद्धू चिल्ले, आशिष आळंगे यांच्या उपस्थितीत नळाला तोट्या बसवण्यात आल्या.

लामजना ग्रामपंचायत कडून गावच्या विकासकामांचा देखावा न करता प्रत्यक्ष कामे करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

पोलीस फ्लॅश न्युजने बातमीच्या माध्यमातून संबंधित प्रकार प्रकाशित केल्यामुळे अखेर लामजना गावातील वार्ड क्रमांक 2 मधील नळाला तोट्या बसवण्यात आल्या व काही प्रमाणात गावातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला. सरते शेवटी लामजना ग्रामस्थांनी पोलीस फ्लॅश न्युजचे आभार मानले.

About The Author