पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांची उद्योग भवन येथील दुकानावर कारवाई 2500 दंड वसूल
उदगीर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या वाढत्या संसर्गजन्य प्रसारामुळे 30 एप्रिल पर्यंत काही वस्तूवर निर्बंध घातले आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तू चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ज्या वस्तूवर शासनाने निर्बंध घातले आहेत, अशा वस्तूंच्या व्यापाऱ्यांनी दुकाने चालू केली असल्याची माहिती उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार गोरख दिवे यांनी त्यांच्या पथकासह 13 एप्रिल रोजी दीड वाजण्याच्या सुमारास उद्योग भवन परिसरात दाखल झाले.तेव्हा तेथिल सोन्या चांदीचे दुकान चालू असल्याचे निदर्शनास आले, सोन्या चांदीच्या दुकानातील गर्दी पाहून पाच दुकानावर दंडात्मक कारवाई करीत दोन हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला.सदरील दुकाने बंद करण्यास भाग पाडले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक एडके, पोलीस नाईक मडोळे, पोलीस नाईक फुलारी आदींच्या पथकाने कारवाई करीत दंड वसूल केला.