गुढी उभारू, गुढी उभारू आनंदाची, उत्तम आरोग्याची, यशाची कीर्तीची, गुढी उभारू संदेश देऊनी आरोग्यम् धनसंपदा
मानवाचा सर्वात सुंदर चांगला सोबती म्हणजे आरोग्य आहे. आरोग्य चांगले तर आपण चांगले, आपण चांगले तर जग चांगले जग चांगले तर संपूर्ण जीवन चांगले होऊ शकते केवळ उत्तम आरोग्य मुळेच!
आरोग्याचे दोन प्रकार आहेत, शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य दोन्ही आरोग्य जर चांगले असले तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आपण होऊ शकतो. आपल्याकडे किती पैसा आहे किती मालमत्ता आहे किती एकर जमीन आहे हे आपण नेहमी विचार करत असतो परंतु देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे आपले शरीर कितपत चांगले आहे किती आपण त्यामध्ये कमाई केलेली आहे हे आपण कधीच विचार करत नाही. बालपणीचा काळ सुखाचा ….फक्त आपण खातो खेळतो आणि आनंदी जीवन जगतो कारण कुठल्याच प्रकारची चिंता आपल्याला नसते. मानसिक चिंता असते ना शारीरिक व्याधी झाली तरी त्याकडे आपण लक्ष देऊन रडत ना बसतो .केवळ आपण चांगले जीवन जगण्यासाठी जगत असतो.
परंतु ज्या वेळेला आपल्याला समजते, कळते आपल्यावर जबाबदारी येतात त्या वेळेला मात्र आपण केवळ आणि केवळ कमाई च्या मागे लागतो. करिअरच्या मागे लागतो त्यामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे 99% दुर्लक्ष आपण करत असतो आपल्याला हवी असते ती संपत्ती, बंगला ,गाडी ,कार.,आणि आजकाल ,दिखावा……. पण किंमत नसते आपल्या मानसिक आणि शारीरिक व्यवस्थेचे म्हणूनच वरचेवर आपले आरोग्य बिघडत जात असते आधीच परिस्थिती अशी आहे की सगळीकडे रासायनिक पदार्थ, रसायन खते यामुळे चांगले अन्न मिळत नाही आणि त्याच बरोबर आपण आपली मानसिकता आणि आपले दररोज ची दिनचर्या इतकी बदलली आहे की त्यामुळे आपले आरोग्य बिघडत आहे. आणि आपली संपदा हळूहळू कमी होत चालली आहे.ती संपदा म्हणजे शारीरिक आणि मानसिक संपदा.
परंतु काही माणसे असे आहेत की शरीरसंपत्ती कडे शंभर टक्के लक्ष देऊन आपल्या जीवनामध्ये आनंदी जीवन जगत असतात परंतु असे व्यक्ती केवळ एक टक्केच आपल्याला पाहायला मिळतील आणि इतर व्यक्ती मात्र वयाच्या चाळीशीनंतर विचार करतात की आपल्याला बर्याच प्रकारचे व्याधी झालेले आहेत आपले मन फार खिन्न झाले आहे.तर आता आपण कशा कडे लक्ष न देता आरोग्याकडे लक्ष देऊया आणि म्हणून खूप कमावलेला पैसा त्यावेळेला खर्च करू लागतात जर हा विचार आधीपासूनच केला असता आरोग्याकडे वेळोवेळी लक्ष दिले असते तर नंतर ते दुरुस्त करायची गरज राहिली नसती. सुरळीत जीवन चालू राहिले असते.
म्हणूनच जे कोणी वाचत मंडळी आहेत त्यांना मला आता असं सांगावं वाटतंय की पहिल्यांदा धनसंपदा म्हणजेच आरोग्याची संपदा तुम्ही कमवा त्याचबरोबर त्याला जोड असे मानसिक संपत्तीची तीसुद्धा सदृढ होणे अत्यंत गरजेचे आहे .चांगल्या आरोग्यामध्ये चांगले मन वास करते आणि चांगल्या मनाची माणसे उत्तम आरोग्याची असतात या दोन्ही एकमेकांच्या जोडिला असणाऱ्या गोष्टी आहेत.
त्या वेळेला पैसा, ईश्वर आपल्याला सगळेच मिळू शकते केवळ आपले मन चांगले असेल तर आपल्याला कुठलीही गोष्ट असाध्य नाही. म्हटलेलेच आहे” मन चंगा तो कटौती मे गंगा”. आपल्याला जर मनाने आरोग्य चांगले वाटले तर आपण ईश्वराच्या सान्निध्यात राहू शकतो ,त्याच्या जवळ जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे चांगले मन…. सांगा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? तर याचे उत्तर सगळेच सांगतील ती उत्तम आरोग्यवान आनंदी व्यक्ती हा सर्वात सुख संपत्ती वान व्यक्ती आहे असे म्हणू शकतो.
खरं म्हणजे पृथ्वीवरील माणुसच पुन्हा एकदा जुनी आठवण काढून नव्या गोष्टीकडे वळला जुनं ते सोनं स्वीकारला रूढी परंपरा त्या किती महत्त्वाच्या आहेत हे जाणून घेतलं तर जीवन सुखकर होऊ शकते.
माणुसकी,स्वच्छता, निस्वार्थीपणा, कुटुंब व्यवस्था, पैशांचा दुरुपयोग, व्यसनाधीन होणे, विलासीपणा, ऐषारामी जीवन, विनाकारण केले जाणारे प्रवास , देवस्थानांच वाढलेलं प्रस्थ, श्रीमंती , माजमस्ती, वडीलधाऱ्या सोबत उद्धटपणे बोलणे, सत्तालोलुपता, मग्रुरी , गुंडगिरी, जगण्याचा अर्थ, मरणाची भीती , केलेल्या वाईट कृत्यांची आठवण, समारंभात केलेला पैशांचा अपव्यय, निकृष्ट जीवन शैली, अशा अनेक गोष्टी शिकवायला आलेला हा एक संदेश आहे .
पूर्वीच्या परंपरा विसरून आम्ही आधी तुळशीला घराबाहेर काढलं ! “
त्याला काय होतंय ? ” हा प्रश्न विचारणाऱ्या नवीन पिढीला हा चांगलाच झटका आहे !!!
सकाळी शुचिर्भूत होणे ही संकल्पना हळू हळू लयास चालली होती . कधीतरी वाट्टेल तेव्हा अंथरुणातून उठून “शॉवर” खाली दोन मिनिटं उभे रहाणाऱ्या पिढीला , आता दोन दोन मिनिटाला हात धुवावे लागत आहेत .
घरात, कापूर , उदबत्ती , देवापुढे दिवा ह्या सगळ्या गोष्टींना अंधश्रद्धेच्या सोईस्कर नावाने फाटा दिला गेला होता. आता त्याच कापरासाठी मॉल मध्ये लाईन लागलीय . संध्याकाळची उदबत्ती लावून म्हटलेली रामरक्षा ही वरदान ठरतेय.
घरी आल्यावर आधी पायावर पाणी घेणारी आपली संस्कृती सोडून बुटासकट बेडवर झोपून , बूट मोजे काढून भिरकवणारे आता चांगलेच पोळले आहेत.
धूप, दीप, नैवेद्य, आरतीमुळे प्रसन्न होणारं घरातलं वातावरण आता कमालीचं गढूळ झालं होतं.
पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी तर “घरचं जेवण” लोक हळू हळू विसरत चालले होते. आता त्याची नितांत गरज भासतेय.
उठलं की सुटलं, प्रत्येक सुट्टीला गाडी घेऊन पर्यटन हेच जीवन असं थोडं वाटायला लागलं होतं, त्यावर पण थोडा आळा बसेल.
अंधश्रद्धेच्या नावाखाली आपणच आपल्या संस्कारांची दिलेली तिलांजली आता आपल्याच बोकांडी बसलीय.
सणासुदीच्या रूपाने पूर्वजांनी केलेली रचना किती वेडगळ पणा आहे हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध करणारी पिढी आता त्या मार्गाचा अवलंब नक्की करेल असं वाटायला लागलय .*
शेवटी निसर्गापुढे सगळे सारखेच . रस्त्यावरच्या भिकाऱ्याला किंवा स्कॉर्पियोमधून फिरणाऱ्या श्रीमंताला “मास्क” बांधून फिरायची वेळ आलीय .
हे मानवा…….तू कितीही पुढारलास तरी शेवटी तुझ्या जगण्याची गुरू-किल्ली फक्त त्या नियंत्याकडेच आहे. त्यामुळे त्याचं स्मरण कर .
जैन मुनींनी तोंडाला फडकं बांधलेलं बघून हसणारे आज तेच करताहेत.
फक्त त्यांचा उद्देश कीटक मरू नयेत हा होता
पण आज आपला उद्देश फक्त आपण जगावं हाच आहे.
पुराण ,ग्रंथ ,उपनिषदे यांच्यावरची धूळ झटका तरच हा झटका पचवण्याची ताकद तुमच्यात येईल.
अन्यथा वडापाव, बर्गरच्या पिढीला असे कितीतरी कोरोना दर चार वर्षांनी झेलावे लागतील त्यासाठी…….
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे ,
आरोग्य दे , सर्वांना सुखात ,आनंदात , ऐश्वर्यात ठेव
जगावरील संकट टळून सर्वांना उदंड आयुष्य दे…
सर्वाचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम सर्वांचे मुखात अखंड राहू दे ही पर्थना
आता सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे सर्व जग हैराण झाले आहे. नैसर्गिक आपत्ती, आरोग्याचे आपत्ती आली की आपल्याला सगळे काही सुचते भौतिक गोष्टी ह्या किती बिनकामाच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आरोग्याची आहे आता सर्वांना समजू लागले आहे. भारत देश हा कृषीप्रधान देश आहे सोन्याचा धूर आलेला देश आहे आयुर्वेदिक जडीबुटी चा देश आहे असे असून सुद्धा आपण दुर्लक्ष केले आणि आता मात्र पुन्हा त्याचा शोध घेण्याच्या मार्गाकडे लागलो आहोत.
“हरवले ते गवसले “अशी आता आपल्या भारतीयांची धारणा झाली आहे ते तसे करत देखील आहेत. म्हणूनच सर्व मानव जातीने जन्मताच धडे दिले पाहिजेत धडे समजून घेतले पाहिजेत “आरोग्य हीच आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे”. ज्याच्याकडे आहे त्याला कुठल्याच गोष्टीमध्ये प्रश्न निर्माण होणार नाहीत.
हसणे, खेळणे ,चांगले विचार करणे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, योग्य आहार ,योग्य विहार, एकमेकांना प्रेरणा देणे या सर्व गोष्टीतून आपल्याला उत्तम आरोग्य उत्तम मानसिकता मिळत असते …..तर चला सर्वजण मिळून आपण हे पुन्हा सुरू करूया आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमाने ,प्राणायाम च्या माध्यमाने, योगासना च्या माध्यमाने, चांगल्या विचारांच्या माध्यमाने आपण पुन्हा एकदा वळूया आपल्या उत्तम आरोग्याकडे……
व्यायामात् लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखं।
आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्॥
व्यायामाबरोबर आपण दीर्घायुषी सुख-समृद्धीवान, बलवान राहणे व निरोगी राहणे हे आपले परम भाग्य आहे. या सर्वांमुळे आपले आरोग्य आणि सर्व कार्य सुद्धा सिद्ध होत असते.
आपण जसे वृक्ष संवर्धन करतो, धनाचे वृद्धी करतो, ज्ञान वाढवतो, कुटुंबाचे रक्षण करतो, स्वतःच्या करिअरमध्ये पुढे पुढे जात असतो…. अगदी तसेच आता आपण स्वयम् आरोग्य संवर्धन करू या…. मानसिक आरोग्य संवर्धन करू या.. उत्तम जीवन जगूया
सात आपण असा संकल्पच करूया की गुढी उभारू आनंदाची गुढी उभारू आरोग्याचे चांगले आरोग्य चांगले जीवन गुढी उभारून समृद्ध तेची विज्ञानाची यशाची कीर्तीची चांगल्या आरोग्याची आरोग्यम धनसंपदा
भारतीय नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गुढी पाडवा
सौ. मंजुषा कुलकर्णी
मुख्याध्यापिका
सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक
विद्यालय उदगीर.
आमच्या वाचकासाठी सादर..कृपया प्रतिक्रिया कळवाव्यात...