गोरक्षण आत्मनिर्भर व्हावे यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – डाॅ.रामप्रसाद लखोटीया
उदगीर (एल.पी.उगीले) : मराठवाड्यातील उत्कृष्ट गोशाळा म्हणून ओळख निर्माण झालेले सोमनाथपुर गोरक्षण संस्था आर्थिक स्वावलंबनासाठी सुजाण नागरिकांनी व गोभक्तांनी सहकार्य करावे ज्यामुळे सदरील गौरक्षण संस्था आत्मनिर्भर होऊ शकेल व गोसंवर्धन शक्य होईल.गोवंश वृद्धीसाठी व जपवणुकीसाठी समाजातील दानशूर व्यक्तीने पुढाकार घ्यावा, ज्यामुळे गोरक्षण (गोशाळा) संस्था ता.उदगीर आत्मनिर्भर करण्यास सोयीचे होईल असे आवाहन गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रामप्रसाद लखोटिया यांनी केले आहे. गोवंश संवर्धन व वाढीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष तज्ञांच्या बैठकीत ते बोलत होते.या कार्यक्रमाला डॉ. अशोक काळे पुणे, डॉ. रवींद्र वर्धमान पुणे, डॉ.आर.आर.मुगळे, अधिष्ठा पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर, गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटीया,डॉ.सुधाकर अंबडकर, डॉ. अनिल पाटील,सुबोध आंबेसंगे, शिवदासे,सोपान गवारे, सागर महाजन,नरसिंग कंदले,प्रशांत मांगरूळकर,मोतीलाल डोईजोडे, तानाजी हजारे उपस्थित होते.
सदरील बैठकी दरम्यान अर्क तयार होणाऱ्या मशीनचे उद्घाटन डॉ.आर.आर. मुगळे अधिष्ठा पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर व या गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटीया यांच्या हस्ते झाले.पुढे बोलताना डॉक्टर लखोटिया यांनी गोरक्षण बद्दलची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, गोरक्षण संस्थेची निर्मीती 1960 ला झाली. या गोशाळेत आज 230 गाई व ८० लहान वासरे आहेत. या गोशाळेला एकूण 50 एकर जमीन असुन त्यापैकी दहा एकर जमीन भिजवनी खाली असून बाकी कोरडवाहू आहे. यातूनच व शाळेचे कामकाज होते. अर्क निर्मिती मशीनची दैनंदिन क्षमता ही 50 लिटर गोमुत्र टाकल्यानंतर दर दोन तासाला 15 लिटर अर्क तयार होते. मेक इन इंडिया या धर्तीवर मेक इन उदगीर गोशाळेत तयार होत आहे. हायजेनिक प्रोजेक्ट सामान्यांना सहजरीत्या उपलब्ध होईल. या धर्तीवर गोरक्षण संस्थेत याचे काम चालू आहेत. मराठवाड्यातील मेक इन इंडिया या धर्तीवर मेक इन उदगीर गोशाळेत अर्क तयार होत आहे. सहजरीत्या उपलब्ध होईल या गोरक्षण संस्थेत तयार झालेले अर्क मानवी शरीरासाठी वरदान ठरणार आहे.हे मानवी शरीरातील विविध आजारावरती राम बाण उपाय ठरणार आहे. त्याच बरोबर मुक्या प्राण्यांना सुद्धा औषधी म्हणून वापरता येणार आहे.गोशाळेला चारा देणगी तथा अनुदान देणाऱ्याची आवश्यकता आहे. या गो शाळेत गाईच्या शेणापासून लाकूड निर्मीती.व पुढे कापूर,आगरबत्ती,धूप,तयार होणार आहे.तरी गोशाळेत तयार होत असलेल्या अर्कचा फायदा उदगीरकरांनी जास्तीत जास्त घ्यावा, असे आवाहनही डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी केले आहे.
