लातुर जिल्ह्यात नवीन 1761 कोरोनाबाधित; 8 रुग्णांचा मृत्यु
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 34718 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 1916 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.
लातूर जिल्ह्यात 1571 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 546 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तसेच प्रलंबित मधील 132 कोरणा बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 3490 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 1083 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 48555 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 13016 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 821रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 34718 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 661 आहे. आरटिपीसीआर मधील 296 अहवाल प्रलंबित आहेत.