जवानीच्या उंबरठ्यावर वासनेचे फुटले कोंब!! अनैतिक आणि अनैसर्गिकची उठली बोंब!!!

जवानीच्या उंबरठ्यावर वासनेचे फुटले कोंब!! अनैतिक आणि अनैसर्गिकची उठली बोंब!!!

शिरूर आनंतपाळ (कैलास साळुंके / किशोर सुरशेट्टे) : जवानीच्या उंबरठ्यावर आलेल्या एका तरुणास वासनांध घेरले आणि त्याने सारासार विवेक बुद्धी गहाण ठेवून  अनैसर्गिक आणि नैतिक कृत्य केले. यासंदर्भात शिरूर आनंतपाळ पोलीस स्टेशन येथे रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील महेश नामक  (17 वर्ष)  विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरी हालकी येथे दिनांक 9 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन लहान बालकांना जे एक जण सात वर्षाचा, तर दुसरा आठ वर्षाचा त्या दोघांना फायर गेम दाखवण्याचे लालूच देऊन घरी बोलावून घेतले.  घराची कडी लावून त्या दोन्ही मुलांच्या अंगावरचे कपडे काढून दोन्ही बालका वर  अनैसर्गिक संभोग केला. त्यानंतर सदरील प्रकार कोणास सांगू नको म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिनांक 13 एप्रिल रोजी  दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास दिल्याने विधी संघर्ष बालक महेश याच्या विरोधात गुरनं. 81/ 21 कलम 377, 342, 506, 504 भारतीय दंडविधान संहितेच्या सह कलम 3(अ) 4 ,5 (एम) 6 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्हा पोलीस निरीक्षक पी. बी. कदम यांनी दाखल करून तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक स्वामी यांच्याकडे हस्तांतरित केला आहे.

 याप्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री काळे यांनी तात्काळ भेट देऊन अधिक माहिती घेतली आणि तपासाच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना केल्या. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर आनंतपाळ पोलीस अधिक तपास करत आहेत.

About The Author