राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी

राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी

लातुर (कैलास साळुंके) : सध्या राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणू ने थैमान घातले असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. मागील एक वर्षापासून संपूर्ण विश्व महामारीचा सामना करत आहे. मागील वर्षी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रत्येकाने राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करत बाबासाहेबांना अभिवादन केले होते.

2021 यावर्षी ही राज्य शासनाने कोरोना विषाणू च्या संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन करत सोशल डिस्टन्स तसेच मास्क परिधान करुन ह लातूर तालुक्यातील नांदगाव येथे दि. 14 एप्रिल बुधवार रोजी नांदगाव येथील भीम नगर येथे विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी सर्वप्रथम मुख्य ध्वजारोहण करत सामुहिक वंदना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच यावेळी सर्व उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन केले.

यावेळी गावातील ज्ञानोबा कांबळे, कुंडलिक घोबले, नामदेव सातपुते, रोहित पाटील, कृष्णा वाघमारे, कैलास साळुंके, मधुकर घोबले, मनोज घोबले, निलेश घोबले, हिरास कुसभागे, सतिष कुसभागे, महेश घोबले, रोहित कांबळे, रवि घोबले, जय भीम घोबले, किशोर घोबले, सतिष सातपुते, हसन चाऊस, विनोद घोबले, प्रशांत घोबले, तसेच महिला उषा घोबले, निता घोडके, मनीषा कुसभागे, वैशाली घोबले, शालु घोबले आदी जण उपस्थित होते.

मी नेहमीप्रमाणे दैनंदिन कामकाजासाठी लातूर ला निघालो होतो. त्यातच काही तरुण मित्रांनी मला हाक मारली… कैलास भैय्या ध्वजारोहण करायच आहे मी तुमची वाट पाहत बसलो होतो… मी लगेच त्याला होकार दिला आणि ध्वजारोहण करण्यासाठी बौद्ध विहाराकडे गेलो…त्या ठिकाणी गेल्यानंतर मी तात्यांना म्हणालो तात्या पूजा करून घेऊ… तात्या मला काय म्हणाले खरा मान तुमचा आहे एक वार्ताहर, एक पत्रकार म्हणून तुमच्या हस्ते हा ध्वजारोहण पार पाडायचा आहे…हे शब्द कानावर पडताच मन भरून आले…आणि ध्वजारोहणाचा मान मिळाल्याने खूप आनंद झाला… – कैलास साळुंके (उपसंपादक,पोलीस फ्लॅश न्यूज)

About The Author