महावितरण खात्याचा भोंगळ कारभार वर् शेतीतील विजेचे तार खाली लोंबकळतात, जीवित हानी होण्याची श्यकता
वाढवणा बु. (हुकूमत शेख ) : वाढवणा बु येथील शेतकरी काशिनाथ फुलारी यांच्या शेतातील गट क्रमांक 687 मधील विजेच्या तारा वर्षा पासुन खाली लोंबकळतच आहेत, अनेक वेळा शेतकरी फुलारी यांनी सांगुन देखील संबंधित उपअभियंता हाळी यांच्याकडे लेखी माहिती देऊन देखील लाईनमन तार ओढून घेत नाहीत. अनावधानाने काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी जवाबदारी संबंधित खात्याची राहील.
फुलारी यांचे शेत गावालागतच असल्यामुळे गुरेढोरे, तसेच कामा निमित्त येथे माणसांची रेलचेल राहाते, अचानक तार लागुन जीवित हानी होण्याची श्यकता नाकारता येत नाही. सद्या उन्हाळा सुरु झाला असुन या शेतीत विहीर आहे. सावलीत बसण्यासाठी आलेले तरुण, गुरेढोरे चारणारे गुराखी व गुरे येथे थंड पाणी पिण्यास येतात. काहीजण तर झाडाखाली सावलीत बसून विश्रांती घेताना दिसतात. अशात नजर चुकीने हात लागल्यास, ताराला स्पर्श झाल्यास, विजेच्या झटक्याने जीवित हानी होण्या अगोदर संबंधित खात्यातील कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर तारा ओढून घ्याव्यात, व पुढील होणारा अनर्थ टाळावा, वरिष्ठानी जातीने लक्ष घालुन तार ओढून सहकार्य करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
