आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत रामवाडीचा रेणुका संघ विजेता तर आनंदवाडीचा सोमेश्वर संघ उपविजेता ठरला

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत रामवाडीचा रेणुका संघ विजेता तर आनंदवाडीचा सोमेश्वर संघ उपविजेता ठरला

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील खेळाडूना प्रोत्साहन देण्यासाठी रेणापूर पिंपळफाटा परिसरातील स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत रामवाडी येथील रेणुका रेसिडेन्सी संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. यशस्वी संघांना रोख पारितोषकासह स्मृतीचिन्ह देऊन भाजपाचे युवा नेते ऋषिकेश रमेशआप्पा कराड यांनी अभिनंदन केले.आमदार चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना दि 27 मार्च 2023 सोमवार रोजी सायंकाळी अटीतटीचा तेवढाच उत्साहवर्धक झाला. ऋषिकेश कराड मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रथम रेणुका रेसिडेन्सी रामवाडी या संघास 71 हजार रुपये, द्वितीय सोमेश्वर प्रतिष्ठान आनंदवाडी या संघास 51 हजार रुपये, तृतीय प्रगती इलेव्हन रेनापुर संघास 41 हजार रुपये आणि चतुर्थ स्वर्गीय श्याम दादा अकनगिरे प्रतिष्ठान या संघास 31 हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि आमदार चषक युवा नेते ऋषिकेश कराड यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी भाजपा ओबीसी आघाडीचे मराठवाडा संघटक डॉ. बाबासाहेब घुले, तालुकाध्यक्ष अडँ दशरथ सरवदे, सांगायोचे अध्यक्ष वसंत करमोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू मालिकावीर महेश चव्हाण, उत्कृष्ट फलंदाज महेश चव्हाण, उत्कृष्ट गोलंदाज हरिदास कराड, क्षेत्ररक्षक संतराम पवार, सामनावीर सौरव जांभळे अशी विविध हजारो रुपयांची वैयक्तिक पारितोषिके खेळाडूंना देण्यात आली. स्पर्धेचे पंच आवेंज सिद्दिकी, धोंडीराम चव्हाण, बालाजी दुडे, गुणलेखन संतराम पवार, समालोचन भाऊसाहेब राठोड, प्रसाद राठोड त्याचबरोबर स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांचा आणि संघ मालकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

प्रारंभी उपस्थित सर्व पाहुण्यांचा संयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले. याप्रसंगी उज्वल कांबळे, दत्ता आंबेकर, सुरेश बुड्डे, संतोष चव्हाण, दत्ता उगिले, अंतराम चव्हाण, अजित पाटील, गणेश चव्हाण, कार्तिक गंभीरे, संयोजन समितीचे विजय चव्हाण, उत्तम चव्हाण, सौरभ कराड, संतोष राठोड, गणेश माळेगावकर, सचिन शिरसकर धोंडीराम चव्हाण, बालाजी दुट्टे, गणेश राठोड, भाऊसाहेब राठोड, अनंत चव्हाण, विशाल चव्हाण यांच्यासह अनेकजण होते.

About The Author

error: Content is protected !!