मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ८ रूग्णांना ४ लाख २५ हजाराची मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ८ रूग्णांना ४ लाख २५ हजाराची मदत

उदगीर (एल.पी.उगीले) : मतदारसंघातील नागरिकांना गंभीर स्वरुपाचा म्हणजे कर्करोगासारखा आजार झाल्याने व त्यांची उपचार घेण्याची परिस्थिती नसल्याने रुग्णांनी आ. संजय बनसोडे यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करण्यासाठी विनंती केली होती. त्यामुळे संबंधित रुग्णांना तात्काळ मदत करण्यासाठी आ. संजय बनसोडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी लेखी पत्राद्वारे विनंती केली होती. या पत्राची दखल घेवुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार मागील 1 जुलै 2022 ते 1 मार्च 2023 या कालावधीत एकूण आठ गंभीर स्वरूपाच्या आजारी असणाऱ्या रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 4 लाख 25 हजार रुपयाची मदत करण्यात आली आहे.

मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाची उभारणी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उदगीर येथील सामान्य रुग्णालयात विविध औषधांचा पुरवठा, ऑक्सिजन प्लान्टसह पहिल्या आमदार फंडातून रुग्णांच्या सेवेकरीता 12 कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत. अशा विविध सुख सुविधा आ. संजय बनसोडे यांनी आपल्या प्रयत्नातून आजपर्यंत केल्या असल्याने गोरगरीब रुग्णांना याचा लाभ होत आहे. आमदार बनसोडे यांच्या या दूरदृष्टी नेतृत्वामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होत असल्याने गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी आ. संजय बनसोडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

About The Author

error: Content is protected !!