1 एप्रिल 2023 पासून ऑटो चालकांना ड्रेस कोड व बॅज बाळगणे अनिवार्य
लातूर (एल.पी.उगीले) ऑटो चालकांना युनिफॉर्म कोड आणि बॅज अनिवार्य करण्यात आले आहे. अवैध ऑटो चालकांची संख्या रोखण्यासाठी तथा लहान बालकांना ऑटो चालवण्यापासून रोखण्यासाठी व्याज अनिवार्य असल्यामुळे वाहतुकीला एक शिस्त लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, सोमय मुंढे पोलीस अधीक्षक लातूर, अजय देवरे, अपर पोलीस अधिक्षक लातूर ,जितेंद्र जगदाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे लातूर शहरातील जनतेस वाहतुकीचे नियम व शिस्त पाळण्याबाबत तसेच ऑटो रिक्षा चालकास, मालकास लातूर पोलीस दलातर्फे व वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे आवाहन करण्यात येते की, मागील चर्चासत्रात व बैठकीत ठरल्या प्रमाणे शहरातील सर्व ऑटो रिक्षा चालकांनी रोडवर ऑटो रिक्षा चालवत असताना युनिफॉर्म ( ड्रेस ) परिधान करणे व बॅज बाळगणे 01 एप्रिल 2023 पासुन अनिवार्य करण्यात आले आहे.
जानेवारी 2023 पासुन आज पावेतो वाहतूक नियंत्रण शाखेने केलेली कार्यवाही खालील प्रमाणे.ओव्हर स्पीड एकूण केसेस – 2018 एकूण दंड – 35,58,500/-, ऑटो रिक्षा वरील एकूण केसेस – 2782 एकूण दंड – 1,709,350/-, सायलेन्सर फटाका वरील एकूण केसेस – 215 एकूण दंड – 2,14,500/- , फॅन्सी नंबर प्लेट वरील एकूण केसेस – 1038 एकूण दंड – 6,66,500/-, ट्रिपल सीट वरील एकूण केसेस – 2187 एकूण दंड – 21,87,000/-, अवैध प्रवासी वाहतूक वरील एकूण केसेस – 39 एकूण दंड – 64,000/-, इतर एकूण केसेस – 34714 एकूण दंड – 2,66,70,300/-इत्यादी प्रमाणे कार्यवाही करण्यात आली असून लातूर शहरातील वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी व वाहतूक नियमांची अंमलबजावणी व्हावी म्हणून शहरातील NGO व संस्था यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत.
ऑटो रिक्षा चालक-मालक व ऑटो रिक्षा संघटना तसेच काळी पिवळी व ट्रॅव्हल्स यांच्या बैठका घेण्यात आल्या असून ऑटो रिक्षा चालक व मालक संघटना यांनी 1 एप्रिल 2023 पर्यंत युनिफॉर्म बाबत अनिवार्य करण्याबाबत सवलत द्यावी असे मागणी केली होती. तसेच व्यापारी महासंघ, विद्यार्थी, हातगाडे यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. लातूर शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी व वाहतुकीस शिस्त लागावी, म्हणून महानगरपालिका बस डेपो विभागीय कार्यालय रापम यांना वाहतूक संदर्भाने पत्रव्यवहार केले आहे. त्यात मुख्यतः मनपा यांना ऑटो रिक्षा थांबे LMT सिटी बस व सिग्नल व्यवस्था इत्यादी अद्यावत करून सहकार्य करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.
जनतेमध्ये वाहतुकीचे नियम पाडणे विषयी जनजागृती व्हावी म्हणून बॅनरिंग, विद्यार्थी अंतर्गत पथनाट्य याचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक यांनी मोबाईल क्रमांक – 8149816049 हा प्रसारित केला आहे. त्यावर जनतेने फटका सायलेन्सर, कर्ण कर्कश हॉर्न इत्यादीचा फोटो काढून व्हाट्सअप करावे, व कार्यवाहीनंतर सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी डिस्काउंट कूपन देणे बाबत मोहीम राबवली आहे. व त्या अंतर्गत कार्यवाही करणे चालू आहे.जानेवारी 2023 पासून ते आज पावतो अनपेड दंड वसुली मोहीम राबवून – 79,51750-/- रुपये दंड वसूल केला आहे. व जे वाहनधारक दंड भरणार नाहीत त्यांचे विरुद्ध कोर्टात खटले पाठविण्याचे काम चालू आहे. व त्यांचे वाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडून ब्लॅक लिस्ट करणे बाबतची कार्यवाही चालू आहे.
तरी लातूर शहरातील जनतेने वाहतूक नियम व शिस्त पाळावे व शहरातील सर्व ऑटो रिक्षा धारकांनी 01 एप्रिल 2023 पासून युनिफॉर्म ( ड्रेस ) परिधान व बॅज सोबत बाळगावे, वाहतुकीचे नियम पाळावे असे पोलीस निरीक्षक, गणेश कदम, वाहतूक नियंत्रण शाखा, लातूर यांचेकडून आवाहन करण्यात आले आहे.
